बोधेगाव : अपघात झाल्यास त्यातून केवळ एक व्यक्ती बाधित होत नसून, त्याच्या संपूर्ण कुटुंबावर परिणाम होत असतो. अपघातांना रोखणे आपल्या हातात असते. वाहन किंवा कोणतेही यंत्र हाताळताना जबाबदारी व काळजीपूर्वक काम केल्यास नुकसान टाळता येते, असे मत केदारेश्वरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आश्विनकुमार घोळवे यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामार्फत दि. ४ ते ११ मार्चदरम्यान सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत बोधेगाव (ता. शेवगाव) येथील केदारेश्वर साखर कारखाना येथे गुरुवारी सकाळी सर्व अधिकारी व कामगारांना कोविडसंदर्भातील नियमांचे पालन करून आरोग्य व सुरक्षिततेची शपथ देण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, मुख्य लेखापाल तीर्थराज घुंगरड, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, मुख्य रसायनशास्रज्ञ के. डी. गर्जे, मुख्य अभियंता प्रवीण काळुसे आदींसह सर्व विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी सर्वांना सुरक्षा शपथ देऊन मार्गदर्शन केले.
----
०५ केदारेश्वर
बोधेगाव येथील केदारेश्वर साखर कारखाना येथे औद्योगिक सुरक्षा सप्ताहांतर्गत सुरक्षा शपथ घेताना सर्व विभागाचे अधिकारी व कामगार वर्ग.