शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक शेतक-याला ‘डीपी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 16:12 IST

एकाच रोहित्रावर (डीपी) अनेक वीजजोड असल्याने शेतक-यांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा न होेणे किंवा रोहित्रांत वारंवार बिघाड होणे, या गोष्टीपासून शेतक-यांना दिलासा मिळणार आहे. आता महावितरणच्या नव्या योजनेनुसार किमान १ व कमाल ३ शेतक-यांना स्वतंत्र्य रोहित्र मिळणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ११ हजार ७०० शेतक-यांना ही उच्चदाब जोडणी मिळणार आहे.

अहमदनगर : एकाच रोहित्रावर (डीपी) अनेक वीजजोड असल्याने शेतक-यांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा न होेणे किंवा रोहित्रांत वारंवार बिघाड होणे, या गोष्टीपासून शेतक-यांना दिलासा मिळणार आहे. आता महावितरणच्या नव्या योजनेनुसार किमान १ व कमाल ३ शेतक-यांना स्वतंत्र्य रोहित्र मिळणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ११ हजार ७०० शेतक-यांना ही उच्चदाब जोडणी मिळणार आहे.नाशिक परिमंडळातील जवळपास ३० हजार शेतक-यांना उच्चदाब वीजवितरण प्रणालीद्वारे (हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्यूशन सिस्टिम) वीजजोडणी देण्यासाठीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात परिमंडळात होणा-या ४०९ कोटी रुपये खर्च असलेल्या कामांच्या निविदा महावितरणने प्रसिद्ध केल्या आहेत. यातून अहमदनगर जिल्ह्यात १६० कोटी रुपये किमतीच्या कामातून जवळपास ११ हजार ७०० शेतक-यांना उच्चदाब वीजवितरण प्रणालीद्वारे वीजजोडणी मिळणार असल्याची माहिती मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिली.मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून वीजजोडणी प्रलंबित असलेल्या राज्यभरातील अडीच लाख शेतीपंपांना उच्चदाब वीजवितरण प्रणालीद्वारे जोडणी देण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेतून होणा-या कामांचा नाशिक परिमंडळातील २९ हजार ४४० शेतक-यांना थेट फायदा होणार आहे. परिसरातील इतर शेतक-यांनाही योजनेतून होणा-या कामांचा लाभ मिळेल. योजनेत एक किंवा दोन, कमाल तीन कृषिपंप वीजजोडणीसाठी १०, १६ किंवा २५ किलोवोल्टचे स्वतंत्र रोहित्र उभाण्यात येणार आहेत. परंपरागत लघुदाब वाहिनीद्वारे दिलेल्या जोडण्यांमध्ये वाहिन्यांची लांबी वाढून गळती वाढते व आकडे टाकून वीजचोरी करण्यास वाव मिळतो. सध्या ६५ व १०० किलोवोल्टच्या रोहित्राद्वारे २० ते २५ शेतीपंपांना जोडणी देण्यात येते. याव्यतिरिक्त आकडे टाकून चो-या करण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. परिणामी रोहित्रांवर ताण येऊन वीजपुरवठ्यात अडथळे व रोहित्र नादुरुस्त (जळण्याचे) होण्याचे प्रमाण वाढण्यासोबत योग्य दाबाने वीजपुरवठा होत नाही. उच्चदाब वीजवितरण प्रणालीमुळे या सर्वच समस्या दूर करता येणे शक्य होणार आहे. उच्चदाबाने थेट वीजपुरवठा केल्याने गळतीच्या प्रमाणात कमालीची घट होईल व या प्रणालीत आकडे टाकता येणार नसल्याने वीजचोरीला आळा बसेल. एका रोहित्रावर किमान एक व कमाल तीन वीज जोडण्या देण्यात येणार असल्याने रोहित्र नादुरुस्त होण्याच्या तक्रारी दूर होतील. परिणामी योग्य दाबाने वीज पुरवठा शक्य होणार आहे.जिल्ह्यात १६० कोटींची कामेयेत्या १५ महिन्यांच्या आत या योजनेतील कामे संपविण्याबाबत सूचना आहेत. मात्र शक्य तितक्या लवकर कामे पूर्ण करण्याचे नियोजन आखण्यात आले असून, त्यानुसार कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अहमदनगर मंडळ कार्यालयांतर्गत १६० कोटी ५१ लाख रुपये खर्चाच्या ४१ निविदा काढण्यात आल्या असून यातून ११ हजार ६६१ शेतक-यांना उच्चदाब वीजवितरण प्रणालीद्वारे वीजजोडणी मिळणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी