शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला : सुजय विखे मंगळवारी करणार प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 19:29 IST

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे हे मंगळवारी (दि.१२) मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

अहमदनगर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे हे मंगळवारी (दि.१२) मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.मुंबईच्या भाजप कार्यालयात दुपारी बारा वाजता हा प्रवेश होणार असल्याचे समजते. सुजय विखे यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघ काँगेसला सोडण्याची मागणी राष्ट्रवादीकडे केली होती. मात्र राष्ट्रवादीने अद्याप मतदारसंघ सोडलेला नाही. विखे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावरही लढण्यास तयार होते. मात्र त्यानंतरही राष्ट्रवादीने अद्याप या मतदारसंघाबाबत निर्णय घेतलेला नाही. राष्ट्रवादीने विखे यांना ताटकळत ठेवल्याने आता आघाडीकडे उमेदवारी न मागता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय सुजय विखे यांनी निश्चित केल्याचे सुत्रांनी सांगितले. ते एकटेच हे पक्षांतर करणार असून वडील राधाकृष्ण किंवा आई शालिनी विखे या मात्र काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात सुजय निखे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी या वृत्तास दुजोरा दिला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील