शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक हुंडेकरी सुखरूप; अपहरकर्त्यांनी सोडले जालन्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 16:03 IST

उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे सोमवारी सकाळी पिस्तुलाचा धाक दाखवून कोठला परिसरातून सिनेस्टाईलने अपहरण करण्यात आले होते. दरम्यान, अपहरकर्ते त्यांना जालना येथे सोडून फरार झाले. त्यानंतर दुपारी हुंडेकरी हे नगरला सुखरुप पोहचले. त्यांना नगरच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

अहमदनगर: नगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे सोमवारी सकाळी पिस्तुलाचा धाक दाखवून कोठला परिसरातून सिनेस्टाईलने अपहरण करण्यात आले होते. दरम्यान, अपहरकर्ते त्यांना जालना येथे सोडून फरार झाले. त्यानंतर दुपारी हुंडेकरी हे नगरला सुखरुप पोहचले. त्यांना नगरच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.       हुंडेकरी हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी घराबाहेर पडले होते. तेव्हा चार जणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून लाल रंगाच्या कारमधून त्यांना पळून नेले होते. गुंडांच्या तावडीतून हुंडेकर यांनी स्वत:ला सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली. घटनेची माहिती समजल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेसह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने विविध ठिकाणी हुंडेकरी यांच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. त्यांचा तातडीने शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.हुंडेकरी यांचे अपहरण करणा-या गुंडांनी चेहºयाला मास्क बांधलेले होते. ही घटना कोठला परिसरातील एका महिलेने पाहिली होती. गुंडांनी अपहरणासाठी वापरलेले वाहनही सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाले होते. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू होता.दरम्यान, अपहरण झालेल्या हुंडेकरी यांची सुखरुप सुटका झाल्याची माहिती सोमवारी दुपारी नगरला समजली. ज्या चार आरोपींना हुंडेकरी यांची अपहरण केले होते. त्यांनी हुंडेकर यांना जालना येथे सोडून दिले होते. त्यानंतर हुंडेकरी हे बसने नगरला येण्यासाठी बसले. बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी शेजारी बसलेल्या युवकाच्या मोबाईलवरुन घरी संपर्क केला होता. त्यानंतर हुंडेकरी हे बसने नगरला येत असताना त्यांना पोलिसांनी जेऊन टोलनाक्यावर ताब्यात घेतले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी