शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
7
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
8
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
9
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
10
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
11
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
12
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
13
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
14
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
15
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
16
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
17
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
18
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
19
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
20
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
Daily Top 2Weekly Top 5

केराचा ‘फेरा’ संपेना!

By admin | Updated: August 7, 2014 00:07 IST

अहमदनगर: महापालिकेच्या खतप्रकल्प निर्मितीसाठी दाखल झालेली एकमेव निविदाही नाट्यमय घडामोडीनंतर स्थायी समितीने रद्द केली़

अहमदनगर: महापालिकेच्या खतप्रकल्प निर्मितीसाठी दाखल झालेली एकमेव निविदाही नाट्यमय घडामोडीनंतर स्थायी समितीने रद्द केली़ ठेकेदाराच्या कार्यक्षमतेबाबत शंका उपस्थित करत फेरनिविदा मागविण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या सभेत घेण्यात आला़ ही नकारघंटा स्थायी समितीच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे़ स्थायीच्या निर्णयामुळे राष्ट्रीय हरित आयोगासमोर शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीत काय सांगायचे? असा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे़स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत स्थायी समितीची सभा झाली़ घनकचरा खत प्रकल्प निर्मितीसाठी प्राप्त निविदेस मंजुरी देण्याचा विषय सभेसमोर होता़ कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा गंभीर विषय यामुळे मार्गी लागणार होता़ याबाबत बुरुडगाव ग्रामस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवर राष्ट्रीय हरित आयोगासमोर सुनावणी सुरू आहे़ न्यायालयाचा दर्जा असलेल्या आयोगाने कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावा, असे आदेश महापालिकेला दिले आहेत़ याविषयी राष्ट्रीय हरित आयोगासमोर पुन्हा शुक्रवारी सुनावणी आहे़ त्यामुळे घाईघाईने सभापतींनी ही सभा बोलविली होती़ सभेत खत प्रकल्पाच्या निविदेस मंजुरी देण्याबाबत चर्चा झाली़ प्रशासनाने पार्श्व एंटरप्रायजेस संस्थेचा बार्शी येथील प्रकल्प पाहणीचा अहवाल सभेसमोर सादर केला़ संस्थेचा बार्शीचा प्रकल्प सुरू नाही आणि त्याची क्षमता ३० ते ४० टन एवढी आहे, असे सांगण्यात आले़ त्यावर तेथील प्रकल्प छोटा आहे़ तुलनेत आपल्या येथे १२५ टन कचरा दररोज निर्माण होतो़ एवढ्या मोठ्या कचऱ्यावर ते प्रक्रिया करू शकणार नाही, असे सांगून सभापतींनी ठेकेदाराच्या प्रतिनिधीस सभेत बोलवा, अशा सूचना केल्या़ संस्थेस काम देण्याबाबत अनेक शंका सदस्यांनी उपस्थित केल्या़ त्यामुळे ठेकेदाराला सभागृहात बोलविण्याचे ठरले आणि त्यासाठी अर्धा तास सभा तहकूब करण्यात आली़ ज्या ठेकेदारासाठी अर्धातास सभा तहकूब झाली तो महापालिकेतच होता़ त्याच्याशी बंद खोलीत चर्चा होऊन सभा पुन्हा सुरू झाली़ पण सभेत ठेकेदार आलाच नाही़ त्याचा दूरध्वनी स्वीच आॅफ झाला़ ठेकेदाराचे प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने सर्वच संतापले़ त्यामुळे ठेका रद्द करण्याच्या निर्णयापर्यंत सर्व आले़ पण एका सदस्याने सोयरिक कशीबशी जमवित ठेकेदाराला बोलविले आणि तो हजर झाला़ ठेकेदारावर प्रश्नांचा भडीमार करून त्यास बाहेर जाण्यास सांगण्यात आले आणि सभापती ठेका रद्द करा, असा आदेश देऊन मोकळे झाले़ मात्र खत प्रकल्पासाठी सात दिवसांची निविदा नोटीस प्रसिध्द करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या़ यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य दीप चव्हाण, सचिन जाधव, अजिंक्य बोरकर, गणेश कवडे यांनी सहभाग घेतला़(प्रतिनिधी)राष्ट्रीय हरित आयोगाचे ताशेरेदररोज १२५ टन कचऱ्याची निर्मिती होते़ हा कचरा बुरुडगाव परिसरात नेऊन टाकला जातो़ त्यावर कोणतीही प्रक्रिया होत नाही़ गेल्या दहा वर्षांपासून हा कचरा महापालिका तेथे टाकत आहे़ प्रदुषण नियंत्रण मंडळाने याबाबत महापालिकेला नोटीस बजावली आहे़ त्यातच गावकऱ्यांनी याचिका दाखल केली आहे़ त्यावर राष्ट्रीय हरित आयोगापुढे सुनावणी सुरू असून, येत्या शुक्रवारीही यावर सुनावणी होणार आहे़ स्थायीतही सकारात्मक निर्णय झाला नाही़ त्यामुळे सुनावणीत काय निर्णय होतो, याची चिंता प्रशासनाला आहे़एक सदस्य पुन्हा ‘सोयरिकी’साठी बाहेरमागील पारगमनच्या निविदेस मंजुरीसाठी घेतलेली सभा एका सदस्याच्या सोयरिकीसाठी तहकूब केली होती़ त्याची पुनरावृत्ती आजच्या सभेतही झाली. एक सदस्य महापालिकेत असूनही सभेला हजर नव्हते. परंतु, अर्ध्या तासानंतर ते सभागृहात आले. हे सदस्य ठेकेदाराशी सोयरिक करायला गेले होते की आणखी कुणाशी अशीच चर्चा सभागृहात रंगली होती. बार्शी येथील प्रकल्पाची क्षमता ३ ते ४ टनाची आहे़ शहरात दररोज १२५ टन कचरा निर्माण होतो़ तसेच दहा वर्षांपासून पडलेला कचरा आहे़ त्यावरही प्रक्रिया करावी लागेल़ एवढ्या मोठ्या कचऱ्यावर ठेकेदार प्रक्रिया करू शकणार नाही़- किशोर डागवाले, सभापतीबार्शी येथील प्रकल्पाची माहिती घेतली असता ३ ते ४ टन कचऱ्यावरच प्रक्रिया होते़ मात्र प्रकल्पाचे उद्घाटन अद्याप झाले नाही, अशी माहिती देण्यात आली आहे़-भालचंद्र बेहरे, उपायुक्त प्रकल्प उभारणीसाठी तीन महिन्यांची मुदतआयोगाने जूनमध्ये तीन महिन्यांची मुदत दिली होती़ त्यानुसार प्रशासनाने २४ जून रोजी स्थायी समितीस याबाबत पत्र दिले होते़ त्यावर स्थायी समितीने ८ जुलै रोजीच्या सभेत प्राप्त दरपत्रकास मंजुरी दिली़ मात्र संबंधित ठेकेदाराचे जिथे कुठे प्रकल्प असतील, त्याची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या़ त्यानंतर याबाबत पुन्हा सभा घेण्यात आली़ यासभेतही विषय मार्गी लागला नाही़ पुन्हा निविदा मागविण्याचा निर्णय झाला़