आॅनलाइन लोकमतपाथर्डी : नगरपालिकेतर्फे शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहिम गुरुवारी पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आली़ पाथर्डी शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली होती़ ही अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेकडून मोहिम राबविण्यात येणार होती़ मात्र, काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता गृहित धरुन पालिकेने पोलीस संरक्षण मागितले होते़ त्यामुळे ही मोहिम राबविण्यास उशीर झाला होता़ तथापि, गुरुवारी ही मोहिम पोलीस बंदोबस्तात सुरु झाली़ शहरातील नाईक चौकापासून उर्दूशाळा परिसर, अजंठा चौक, उपजिल्हारुग्णालय परिसर, मेनरोड परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली़