शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या प्रवेशाची चिंता नाही; १० हजार जागा वाढीव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 15:00 IST

यंदा अकरावी प्रवेशाची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांनाही असणार नाही. कारण या वर्षी दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत तब्बल १० हजार जागा जादा उपलब्ध आहेत. 

अहमदनगर : यंदा अकरावी प्रवेशाची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांनाही असणार नाही. कारण या वर्षी दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत तब्बल १० हजार जागा जादा उपलब्ध आहेत. 

दहावीचा आॅनलाईन निकाल बुधवारी जाहीर झाला. यात नगर जिल्ह्यातून दहावीसाठी एकूण ६९ हजार ५३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ६६ हजार ३६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नगर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत सतरा टक्क््यांनी निकाल वाढला. म्हणजे यंदा जादा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरम्यान, शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाची तयारी  सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवरयंदा जिल्ह्यासाठी कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त अशा शाखांसाठी तब्बल ७६ हजार ७६० जागा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्यात ४४० कनिष्ठ महाविद्यालये असून त्यात ४५३ अनुदानित, २९५ विनाअनुदानित, १९२ स्वयं अर्थसहित अशा एकूण ९४० तुकड्या आहेत. या सर्व तुकड्यांची क्षमता यंदा ७६ हजार ५५० विद्यार्थ्यांची आहे. सर्वाधिक ३४ हजार जागा विज्ञानसाठी एकूण ७६ हजार ६६० जागांपैकी ३४ हजार (४४.३५ टक्के) जागा विज्ञान शाखेसाठी उपलब्ध आहेत. त्यानंतर २९ हजार ६०० जागा कला शाखेसाठी, १० हजार ९७० जागा वाणिज्य शाखेसाठी, तर २ हजार १२० जागा संयुक्त शाखेसाठी आहेत. 

विज्ञान शाखेत प्रवेश वाढणार नेहमीप्रमाणे अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. मागील वर्षी एकूण विद्यार्थ्यांच्या ५४ टक्के विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दिली होती. यंदाही ५० टक्क््यांच्या पुढे प्रवेश विज्ञान शाखेत होण्याची शक्यता आहे. दहावीत सुमारे ६६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण असून त्यातील ५० टक्के म्हणजे ३३ हजार विद्यार्थ्यांनी जरी विज्ञान शाखा निवडली तरी प्रवेश होणार आहेत. परंतु विज्ञान शाखेकडे कल असल्याने कला शाखेतील अनेक जागा रिक्त राहतात. त्यामुळे कला शाखांना प्रवेशासाठी कसरत करावी लागते. यंदाही तिच स्थिती असण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEducationशिक्षण