शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
3
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
4
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
5
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
6
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
7
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
8
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
9
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
10
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
11
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
12
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
13
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
14
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
15
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
16
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
17
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
18
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
19
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच

आरं..आले... खासदार आपले!

By admin | Updated: September 4, 2015 00:13 IST

श्रीरामपूर : कुंभमेळा सुरू होऊन पहिलं शाही स्नान उरकल्यानंतरसुद्धा शोधूनही न सापडणारे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे मुंबई निवासी खासदार सदाशिव लोखंडे एकदाचे मतदारसंघात प्रकटले.

श्रीरामपूर : कुंभमेळा सुरू होऊन पहिलं शाही स्नान उरकल्यानंतरसुद्धा शोधूनही न सापडणारे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे मुंबई निवासी खासदार सदाशिव लोखंडे एकदाचे मतदारसंघात प्रकटले. त्यामुळे ‘आरं..आले.. खासदार आपले!’अशी चर्चा मतदारांत होत आहे. रामनवमी २८ मार्चला झाली. तेव्हा श्रीरामपूरकरांनी राम मंदिराजवळ खासदार पाहिले. त्यानंतर २२ मे रोजी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत टंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीलाही ते हजर नव्हते. मात्र ही बैठक सुरू असतानाच घाईघाईत उशिराने श्रीरामपूरच्या सरकारी विश्रामगृहात तहसीलदार, बी.डी.ओ.ना बोलावून त्यांनी त्यांच्यासह घाईगडबडीत स्वत: सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवडलेल्या मालुंजा गावात विशेष ग्रामसभा घेतली. श्रीरामपूरमध्ये येऊनही टंचाई आढावा बैठकीकडे ढुंकूनही न पाहता ते परतले. मे, जून, जुलै हे पावसाळी महिने कोरडेठाक जाऊन नेहमी हिरवागार असणारा श्रीरामपूर तालुकाही पाणीटंचाईने दुष्काळी छायेत गेला. या छायेतही खासदारांची छाया दिसली नाही. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शिर्डी लोकसभा मतदारसंघात भेडसावत असताना टंचाई आढावा बैठका घेऊन सरकारी यंत्रणा कामाला लावायलाही खासदार मतदारसंघात फिरकले नाहीत. अखेर त्या त्या तालुक्याच्या आमदारांनी उशिरा का होईना बैठका घेऊन मतदारसंघातील पाण्याचा शोध घेतला. संसदेचं अधिवेशन विरोधकांच्या गोंधळात वाहून गेलं तरी खासदारांना मतदारसंघात यायला सवड मिळाली नाही. त्यामुळे गावोगाव स्वपक्षीयांपासून विरोधकांपर्यंत साऱ्यांनीच खासदारांच्या गैरहजेरीविषयी ओरड केली. टाकळीमियाँ (ता. राहुरी) येथील भाजपाचे गणप्रमुख राजेंद्र करपे यांनी तर ‘खासदार दाखवा, बक्षीस मिळवा’, असा युतीच्या खासदाराला घरचा आहेर दिला. नेवासा तालुक्यातही एका गावाने ग्रामसभेत निवडून गेल्यापासून खासदार फिरकले नसल्याने त्यांच्या निषेधाचा ठराव केला. खासदारांचा शोध घेत जनक्षोभ वाढू लागल्यानंतर आता कुठे खासदार शिर्डीत पोहोचले. कोपरगावच्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर हल्ला झाल्यानंतर ते कोपरगावातही दिसले. त्यामुळे मतदारांसह युतीच्या कार्यकर्त्यांनाही हायसे वाटल्याचे म्हटले जात आहे. (प्रतिनिधी)