शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अठरा तासानंतर तरुणाचा मृतदेह सापडला; विहिरीत उडी मारून केली आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:21 IST

अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड परिसरातील तांबटकर मळा येथील एका विहिरीत उडी मारुन आत्महत्या केलेल्या तरुणाचा तब्बल १८ तासानंतर मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे

अहमदनगर : शहरातील गुलमोहर रोड परिसरातील तांबटकर मळा येथील एका विहिरीत उडी मारुन आत्महत्या केलेल्या तरुणाचा तब्बल १८ तासानंतर मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. शकील सजन शेख (वय ३२ रा. तांबटकर मळा, नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.तांबटकरमळा येथील एका विहिरीच्या काठावर शुक्रवारी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिकांना कपडे, मोबाईल व एक चिठ्ठी आढळून आली. या चिट्ठीत आत्महत्या करीत असल्याबाबत लिहिलेले होते. नागरिकांनी याबाबत तोफखाना पोलिसांना माहिती दिली. तोफखाना पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक किरण सुरसे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. कपडे व मोबाईल हे तांबटकर मळा परिसरात राहणाºया शकील शेख याचे असल्याचे पोलिसांना समजले. यावेळी पोलिसांनी शेख याच्या नातेवाईकांना बोलावून विहिरीत मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू केले. या विहिरीत मात्र भरपूर पाणी व खाली गाळ साचला असल्याने मृतदेह  सापडत नव्हता. पोलिसांनी विहिरीत गळ टाकून पाहिले तरीही मृतदेहाचा शोध लागला नाही. त्यानंतर पाण्यातील कॅमेरा आणून विहिरीत सोडण्यात आला. मात्र मृतदेह त्या कॅमे-यातही निदर्शनास आला नाही. रात्री साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी गोताखोर बोलाविण्यात आले. त्यांनी विहिरीत सर्वत्र शोध घेतल्यानंतर अखेर शकील शेख याचा मृतदेह आढळून आला. शकील याने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे समोर आलेले नाही. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी