शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

ऑक्सिजनअभावी दिवसभरात आणखी आठजणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 04:18 IST

अंबाजोगाईत कोविड कक्षात सहाजणांचा मृत्यू; नातेवाईकांचा संताप

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर/बीड : अंबाजोगाई (जि. बीड) येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील कोविड कक्षात बुधवारी दुपारी एका तासात सहाजणांचे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हे मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे, तर या रुग्णांना इतर गंभीर आजार असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगत ‘स्वाराती’च्या अधिष्ठात्यांनी नातेवाईकांचे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, श्रीगोंदा (जि. नगर) येथील ग्रामीण रूग्णालयातही बुधवारी ऑक्सिजनअभावी दोघांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्याचा प्रश्न प्रकर्षाने  पुढे आला आहे.   अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बुधवारी दिवसभरात कोरोनामुळे ११ रुग्णांचा मृत्यू झाला, तर दुपारी १ ते २ या तासाभरात तब्बल सहाजणांचा मृत्यू झाला.  या सहा रुग्णांना ऑक्सिजन मिळाला नसल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.चाचणीवरही संशयकोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याची आरटीपीसीआर चाचणी करून निगेटिव्ह आल्यास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो. बुधवारच्या घटनेतील मृत रुग्णांची मात्र घाईगडबडीत ॲन्टिजेन चाचणी करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आले. प्रशासनाच्या या गडबडीमुळे संशय व्यक्त होत आहे. नगरमध्ये ऑक्सिजन टंचाईअहमदनगर जिल्ह्यात दोन दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा असून, बुधवारी अहमदनगरला ऑक्सिजन पुरवठा करणारे दोन टँकर पुणे जिल्ह्यात अडवून ठेवण्यात आले होते. ते नंतर सोडण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे. राज्यात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्याचा प्रश्न प्रकर्षाने  पुढे आला आहे. 

बुधवारी रात्री १२ ते १ वाजेपर्यंत कोरोनाबाधित ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. हे मृत्यू दमा, हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब व शारीरिक व्याधींमुळे झाले आहेत. यातील बहुतांश रुग्णांचे वय ६०पेक्षा जास्त आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन व्यवस्था सुरळीत आहे.    - डॉ. शिवाजी सुक्रे,     अधिष्ठाता, स्वाराती वैद्यकीय     महाविद्यालय, अंबाजोगाई

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस