शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

शिक्षणतज्ज्ञ सर्जेराव निमसे म्हणतात...परीक्षा न झाल्यास महाराष्ट्राची नाचक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 11:25 IST

अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता पदवी देणे अशैक्षणिक असून विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. देशाच्या इतर भागात परीक्षा होत असताना महाराष्ट्रात त्या न होणे ही राज्याची नाचक्की ठरेल. या प्रकारामुळे आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर हिणवले जाईल. त्यामुळे वेळ जरी लागला तरी परीक्षा घेऊनच पदवी दिली गेली पाहिजे, असे मत शिक्षणतज्ज्ञ व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केले.

अहमदनगर : अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता पदवी देणे अशैक्षणिक असून विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. देशाच्या इतर भागात परीक्षा होत असताना महाराष्ट्रात त्या न होणे ही राज्याची नाचक्की ठरेल. या प्रकारामुळे आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर हिणवले जाईल. त्यामुळे वेळ जरी लागला तरी परीक्षा घेऊनच पदवी दिली गेली पाहिजे, असे मत शिक्षणतज्ज्ञ व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महाविद्यालय व विद्यापीठ पातळीवर अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. त्यावर डॉ. निमसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. कोणत्याही शाखेच्या अंतिम परीक्षांना वेगळे महत्व असते. सध्या विद्यापीठ पातळीवर परीक्षांची सर्व तयारी झालेली आहे. विद्यापीठांनी त्यावर खर्चही केलेला आहे. विद्यार्थी तयार आहेत, पालकांची हरकत नाही, मग शासन परीक्षांना नकारघंटा का देत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी ही घेतलीच पाहिजे. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. 

परीक्षा न घेता दिलेली ‘उसणी’ पदवी घेऊन आपला विद्यार्थी जगाच्या पाठीवर कोणत्या तोंडाने मिरवणार? राष्ट्रीय पातळीवर तो इतर ठिकाणी पुढील शिक्षण घेण्यासाठी गेला तर त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्याचे मनोबल खचेल. शिवाय करिअरच्या दृष्टीनेही त्याला याचा फटका बसणार आहे. 

केवळ अंतिम सत्राचीच परीक्षा घ्यायची असल्याने तसेही विद्यार्थी कमीच आहेत. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होणार आहे. महाविद्यालयांकडे स्टाफ मुबलक आहे. विद्यार्थी व पालकांची तयारी आहे. त्यामुळे शासनाने परीक्षा घेणेच संयुक्तिक ठरेल, असे मत डॉ. निमसे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPune universityपुणे विद्यापीठEducationशिक्षणStudentविद्यार्थी