टाकळी ढोकेश्वर (जि. अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील कासारे येथील ११ वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. वैभव आंधळे असे त्याचे नाव आहे. तो भाऊ भूषणसमवेत घरानजीकच्या तलावाकडे गेला होता. या वेळी वैभव पाण्यात पडला. (वार्ताहर)
तलावात बुडून मुलाचा मृत्यू
By admin | Updated: March 24, 2017 01:50 IST