बालकुमार संस्थेची नुकतीच वार्षिक सभा डॉ. संजय मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी कार्यकारिणीची पुढील तीन वर्षांकरिता निवड करण्यात आली. बालकुमार साहित्य संस्थेच्या पार पडलेल्या बैठकीत सन २०२० ते २०२३ या कालावधीकरिता निवड करण्यात आली आहे. यात खजिनदारपदी प्रा. अरुण लेले, सहसचिव प्रा. विश्वनाथ भुजबळ, सदस्य म्हणून स्मिता गुणे, प्रा. संजयकुमार दळवी, प्रा. ओंकारनाथ बिहाणी, ज्येष्ठ पत्रकार डॉ. संतोष खेडलेकर, सुनीता कोडे, नंदकुमार बेल्हेकर, प्रकाश पारखे, मुकुंद डांगे, दर्शन जोशी यांचा समावेश आहे.
डाॅ. मालपाणी यांनी गतवर्षात संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला. साहित्य संस्थेने निर्माण केलेल्या विविध कार्यक्रमांच्या परंपरेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, यापुढेही संस्थेच्या वतीने अशाच स्वरूपाचे कार्यक्रमांचे आयोजन नव्या प्रतिनिधींनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
डाॅ. मालपाणी यांची राष्ट्रीय स्तरावरील योग संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबददल सत्कार करण्यात आला. अनिल देशपांडे यांनी कार्यवृत्तांत सादर केला.