शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये तलाठी परीक्षेत पाच जण बसले डमी; दहा जणांवर गुन्हा,तिघांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 18:53 IST

महसूल विभागाने घेतलेल्या तलाठी परीक्षेतही पाच बनावट उमेदवारांनी लेखी परीक्षा दिल्याचे गुुरुवारी (दि़२३) समोर आले. या उमेदवारांची कागदपत्रे तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला.

अहमदनगर : नगरमध्ये नुकत्याच झालेल्या संगणक टंकलेखन परीक्षेत डमी विद्यार्थी बसल्याची घटना ताजी असतानाच महसूल विभागाने घेतलेल्या तलाठी परीक्षेतही पाच बनावट उमेदवारांनी लेखी परीक्षा दिल्याचे गुुरुवारी (दि़२३) समोर आले. या उमेदवारांची कागदपत्रे तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. यात पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी तिघांना अटक झाली आहे. याप्रकरणी महसूल विभागातील अव्वल कारकून जीवन भानुदास सुतार यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विशाल सखाराम इंगळे (वय २४ रा़ बावणे, ता़ पुसद, जि़ यवतमाळ), मंगेश कुंडलिक दांडगे (वय ३४, रा़ सुरंगळी ता़ भोकरदन, जि़ जालना), अंजली गोपाल म्हस्के (वय २४ रा़ चैतन्यवाडी, ता. जि़ बुलढाणा), पंढरीनाथ पुंजाजी साबळे, रवी जंगल पवार यांच्यासह इतर पाच अनोळखींविरोधात फसवणुकीसह महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर नमूद परीक्षांमध्ये होणा-या गैरव्यवहारास प्रतिबंध अधिनियम १९८२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील इंगळे, दांडगे व म्हस्के यांना महसूल विभागाने ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. महसूल विभागामार्फत १२ जानेवारीला तलाठी व वाहनचालक पदासाठी येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना २३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कागदपत्रे तपासणीसाठी बोलविण्यात आले होते. उत्तीर्ण उमेदवारांसह विशाल इंगळे, मंगेश दांडगे व अंजली म्हस्के हे तिघे आले होते. परंतु दोघे गैरहजर राहिले. कागदपत्रे तपासणीसाठी आलेले उमेदवार व परीक्षा दिलेले उमेदवार यांची खातरजमा करण्यासाठी प्रशासनाने परीक्षेच्या वेळी काढलेले व्हीडिओचित्रण तपासले. त्यात परीक्षा देणारे उमेदवार दुसरेच असल्याचे समोर आले. त्या अनुषंगाने प्रशासनाने या तिघांकडे अधिक चौकशी केली तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे हे डमी उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले. अधिक चौकशी केली तेव्हा आणखी दोन जण डमी असल्याचे समोर आले. तिघांना पोलिसांच्या ताब्यात देत याप्रकरणी गुरुवारी रात्री फिर्याद दाखल केली़. याप्रकरणी सहायक निरीक्षक मुंडे हे पुढील तपास करत आहेत. यात एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून उर्वरित उमेदवारांचा शोध सुरू आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरexamपरीक्षाPoliceपोलिस