शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे पारनेर तालुक्यातील फुल शेतीचे कोट्यवधीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 16:35 IST

गोरेगावमधून दररोज सुमारे ६०० कॅरेट फुलांची कल्याणला निर्यात होत असे. एका कॅरेटमध्ये १० किलो फुले असतात. परंतु आता फुले खराब झाल्याने ही निर्यातही जवळपास थांबली आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसामुळे फुलशेतीत पाणी साठलेफुले भिजल्याने त्यांचा रंग बदलून काळपट दिसू लागलेफुले ओली झाल्याने त्यांची मागणी घटली.फुलविक्रीतून शेतक-यांचा किमान वाहतूक खर्चही वसूल होत नाही

सुपा : पावसामुळे पारनेर तालुक्यातील गोरेगाव व सुपा परिसरातील फुल उत्पादक शेतक-यांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. फुले भिजल्यामुळे भाव गडगडले असून, शेतक-यांचा वाहतूक खर्चही निघत नाही़तालुक्यातील सुपा परिसर व गोरेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात फुलशेती केली जाते. दीपावलीच्या काळातच नेमके परतीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे फुलशेतीत पाणी साठले तर फुले भिजल्याने त्यांचा रंग बदलून काळपट दिसू लागले. काही फुले ओली झाल्याने त्यांची मागणी घटली. कल्याणला शेवंतीला दहा रुपये प्रति किलो असा भाव मिळत असल्याने फुले तोडण्याचा व वाहतुकीचाही खर्च भागत नसल्याचे पाडळी येथील फुल उत्पादक विजय धोंडिबा दावभट यांनी सांगितले. उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई असल्याने शेवंती लागवडीस उशीर झाला. त्यामुळे गणेशोत्सव व नवरात्रौत्सव काळात फुले उमलली नाही. या दोन्ही उत्सव काळात फुलांना मोठी मागणी असते. गणेशोत्सवाचे व नवरात्रोत्सवाच्या प्रत्येकी १०-१० दिवसात चांगले पैसे होतात. परंतु या वर्षी या काळात फुले न फुलल्याने उत्पन्न बुडाले. त्यानंतर दिवाळीतही पावसाने झोडपल्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सुपा परिसरातील गावाना नगर, पुणे रोडमुळे तातडीने फुले बाजारात पाठवत येतात तर गोरेगाव, हिवरे कोर्डा, पाडळी या गावातून फुले नगरसह कल्याण मार्केटला फुले पाठविली जातात.बाहेरच्या राज्यातून व्यापारी थेट गोरेगावमध्ये येऊन फुले खरेदी करतात़ या वर्षीही बाहेरचे व्यापारी आले. परंतु पावसाने फुलझाडे आडवी झाली, फुले खराब झाले. त्यामुळे मागणी असून फुले खराब झाल्याने नगदी उत्पन्न घटले. काही शेतक-यांचे संपूर्ण पीकच वाया गेले.मार्केटला जाणा-या फुलविक्रीतून शेतक-यांचा किमान वाहतूक खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गोरेगावमधून दररोज सुमारे ६०० कॅरेट फुलांची कल्याणला निर्यात होत असे. एका कॅरेटमध्ये १० किलो फुले असतात. परंतु आता फुले खराब झाल्याने ही निर्यातही जवळपास थांबली आहे. त्यामुळे शेतक-यांचे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे आप्पा नरसाळे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीRainपाऊस