शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गर्दी नियंत्रणात येत नसल्यामुळे नगर बाजार समिती ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 16:17 IST

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी बाजार समिती प्रशासन व जिल्हाधिकारी  यांच्यात मंगळवारी (२४ मार्च) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत  बाजार समितीने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अहमदनगर : कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी बाजार समिती प्रशासन व जिल्हाधिकारी  यांच्यात मंगळवारी (२४ मार्च) दुपारी जिल्हाधिकारी  कार्यालयात झालेल्या बैठकीत  बाजार समितीने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समित्या बंद ठेवून शहरात फेरीवाल्यांना परवानगी देण्याच्या निर्णयापर्यंत प्रशासन आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिका-यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना सूचना दिलेल्या आहेत. परंतु फेरीवाले नेमके कोण? याबाबत तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी नगर बाजार समितीतील भाजी मार्केटमध्ये मोठी गर्दी उसळली होती. ही गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर बंदचा निर्णय घेण्यात आला. .....३१ मार्चपर्यंत कै. माजी खासदार दादा पाटील शेळके नगर बाजार समितीमधील संपूर्ण  भाजीपाला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के व सचिव अभय भिसे यांनी दिली. तेव्हा शेतक-यांनी आपला  भाजीपाला बाजार समितीमध्ये ३१ मार्चपर्यंत विकण्यास आणू नये, असे  आवाहन बाजार समितीच्या वतीने त्यांंनी केले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMarket Yardमार्केट यार्डvegetableभाज्याcorona virusकोरोना वायरस बातम्या