शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नगरमधील चिमुकल्यांसाठी धावणार ड्रॅगन रेल्वे; महापालिकेच्या सभेत शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 14:01 IST

भुतकरवाडी येथील महालक्ष्मी उद्यानात तात्पुरत्या स्वरूपात ड्रॅगन रेल्वे खेळणी बसविण्यात येणार आहे. नालेगाव परिसरात बेघरांसाठी निवारा उभारण्यात येणार आहे.

अहमदनगर : भुतकरवाडी येथील महालक्ष्मी उद्यानात तात्पुरत्या स्वरूपात ड्रॅगन रेल्वे खेळणी बसविण्यात येणार आहे. नालेगाव परिसरात बेघरांसाठी निवारा उभारण्यात येणार आहे. यासह १६ विषयांना मंजुरी देण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीची शुक्रवारी (दि. २९) सभा बोलविण्यात आली आहे, अशी माहिती सभापती सुवर्णा जाधव यांनी दिली.महालक्ष्मी उद्यानामध्ये हे खासगी ड्रॅगन रेल्वे बसविण्यास एकाने परवानगी मागितली होती. त्यानुसार उन्हाळ्याच्या सुटीच्या काळात ५ हजार रुपये महिना व इतर काळात अडीच हजार रुपये महिना या दराने उद्यानातील जागा वापरण्यास देता येईल, असा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आला आहे. सदरची खेळणी नागरिकांसाठी खुली राहणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. कराराच्या काळात खेळणीस अपघात झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितांवर राहील, अशी करारनाम्यात तरतूद करण्यात येणार आहे. उद्यानातील महापालिकेची जागा भाड्याने देण्याचा हा प्रस्तावावर स्थायीत चर्चा होणार आहे. अशी जागा यापूर्वीही दिलेली होती.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरातील बेघरांना निवारा बांधण्यात येणार आहे. यासाठीची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली असून, मे. बेस्ट कन्स्ट्रक्शन कंपनी यांची निविदा स्वीकारण्याची शिफारस छाननी समितीने केली आहे. १ कोटी ७७ लाख एवढा या निवारा इमारतीसाठीचा बांधकाम खर्च आहे. शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानके, सार्वजनिक ठिकाणे इथे रात्रीच्या वेळी थांबणा-यांना या निवा-यामध्ये आसरा मिळणार आहे. एक रात्र मुक्काम, स्नानाची सोय असून, अपंगांसाठी तळमजल्यावर आसरा दिला जाणार आहे, असे सभापतींनी सांगितले. याशिवाय पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, इलेक्ट्रीक विभाग, मोटार व्हेईकल विभागात तात्पुरत्या स्वरूपात काम करणा-या कर्मचा-यांना तांत्रिक खंड देऊन पुन्हा नियुक्ती दिली जाणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका