शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विंचरणा नदीवरील बंधा-याचे दोन दरवाजे गेले वाहून; २० दशलक्ष घनफूट पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 14:48 IST

जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला होता. मात्र, अतिदाबामुळे या बंधा-यातील दोन लोखंडी दरवाजे तुटून वाहून गेले. यामुळे बंधा-यातील निम्मे पाणी वाहून गेले असून, अद्याप पाणी वाहतच आहे. बंधा-याचे दरवाजे वीस फूट अंतरावर सापडले आहेत.

जामखेड : तालुक्यातील वंजारवाडी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला होता. मात्र, अतिदाबामुळे या बंधा-यातील दोन लोखंडी दरवाजे तुटून वाहून गेले. यामुळे बंधा-यातील निम्मे पाणी वाहून गेले असून, अद्याप पाणी वाहतच आहे. त्यामुळे हा बंधारा रिकामा होतो की काय, अशी शंका उपस्थित झाली आहे. बंधा-याचे दरवाजे वीस फूट अंतरावर सापडले आहेत.

वंजारवाडी ग्रामस्थांनी जलसंपदा खात्याच्या अधिका-यांना दूरध्वनीवरून बंधा-याचे दरवाजे वाहून गेल्याची माहिती दिली. पण ते हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे गेल्याचे सांगण्यात आले. ४० दशलक्ष घनफूट क्षमतेचा असलेला हा बंधारा वंजारवाडी व परिसरातील शेतक-यांसाठी वरदान ठरलेला आहे. या बंधा-यामुळे परिसरातील हजारो एकर क्षेत्र बारामाही ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे. दरम्यान रविवारी रात्रीपासून निम्यापेक्षा जास्त पाणी बंधा-यातून वाहून गेले आहे. अधिकारी लक्ष देत नसल्याने शेतक-यांनीच क्रेन बोलावले असून त्याद्वारे दरवाजे बसवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडDamधरण