शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांचा सुळसुळाट; लसींचा तुटवडा

By मिलिंदकुमार साळवे | Updated: July 14, 2018 11:49 IST

राज्यभरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. धुमाकूळ घालणारी कुत्री चावत आहेत. कुत्रे चावल्यानंतर श्वानदंश प्रतिबंधक लस घ्यावी लागते.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : राज्यभरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. धुमाकूळ घालणारी कुत्री चावत आहेत. कुत्रे चावल्यानंतर श्वानदंश प्रतिबंधक लस घ्यावी लागते. पण, या लशींचे उत्पादन करणाऱ्या पुणे येथील हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेकडून या ‘रेबिज’च्या लशींचा कमी प्रमाणात पुरवठा होत असल्यामुळे अहमदनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुटवडा निर्माण झाला आहे.नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान गुरूवारी विधान परिषदेत अहमदनगर जिल्ह्यातील कुत्र्यांचा तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याबाबत आमदार डॉ. सुधीर तांबे, संजय दत्त, शरद रणपिसे, हुस्नबानू खलिफे यांनी हा प्रश्न विचारला होता.अहमदनगर जिल्ह्यातील एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या वर्षभराच्या कालावधीत ४० हजार २८८ श्वानदंश केलेल्या रूग्णांना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रात एप्रिल २०१८ च्या श्वानदंश रूग्णांच्या आकडेवारीवरून अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रोज १ ते २ रूग्ण कुत्रा चावल्यामुळे उपचारासाठी येतआहेत.पुण्याच्या हाफकिन प्रशिक्षण संशोधन व चाचणी संस्थेकडून श्वान दंश प्रतिबंधक ‘रेबिज’च्या लशींचा जिल्हा सामान्य रूग्णालयास पुरवठा होतो. संस्थेकडे ९ हजार लशींची मागणी नोंदविली असताना १७५० लशींचा पुरवठा झाला आहे. त्यांचा जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालये, उप जिल्हा रूग्णालये, जिल्हा रूग्णालयास पुरवठा करण्यात आला आहे. सध्या जिल्हा रूग्णालयाकडे ८०० डोस शिल्लक आहेत. दरमहा दीड ते दोन हजार डोस लागतात. हाफकिन संस्थेत लशींचे उत्पादन होत असले तरी त्या ‘रूग्णांना वापरण्यास योग्य असे’ असे प्रमाणित होण्यासाठी विलंब लागतो. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा होत नाही. मागणीच्या तुलनेत तुटवडा आहे. कुत्र्यांच्या वर्गीकरणानुसार लशी देण्याचा निर्णय डॉक्टर घेतात. पण, अनेकदा रूग्ण कुत्र्याने चाटले तरी इंजेक्शन देण्याचा आग्रह धरतात. हे चुकीचे आहे. त्यामुळे देखील मागणी वाढते.-डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्य चिकित्सक, अहमदनगरकुत्र्यांमुळे निर्माण होणाºया वाढत्या समस्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना देखरेख समिती स्थापन करण्याच्या सूचना आहेत. समितीमार्फत भटके कुत्रे पकडणे, वाहतूक करणे, निर्बिजीकरण, लसीकरण, औषधोपचार,जनजागृती अपेक्षित असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar civil hospitalअहमदनगर जिल्हा रुग्णालय