अहमदनगर : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ‘क्षण हा आनंदा’चा हा कार्यक्रम सावेडीतील श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालेत (प्राथमिक विभाग) साजरा करण्यात आला. यानिमित्त अनाथ व गरीब विद्यार्थ्यांना दिवाळी भेट म्हणून कपडे वाटप करण्यात आले. यावेळी कोरोना काळात विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचाही गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन सुरेश क्षीरसागर हे होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी डी.आर. कुलकर्णी, विकास सोनटक्के, मुख्याध्यापक दुर्योधन कासार उपस्थित होते.
यावेळी सुरेश क्षीरसागर म्हणाले, दिव्यांग हा दिव्यांग नसून, ते समाजाचे एक घटक आहेत. ते दिव्यांग जरी असले तरी ते सर्वच बाबबीत आघाडीवर काम, अभ्यास करीत आहेत. कोरोना काळातही शिक्षण देण्याचे काम शिक्षक अविरतपणे करीत आहेत. त्यांची धडपड प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली कुलकणी यांनी केले, तर आभार धनश्री गुंफेकर यांनी मानले.
-------------
फोटो- ०६ समर्थ स्कूल
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ‘क्षण हा आनंदा’चा या कार्यक्रमात सावेडीतील श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालेत अनाथ व गरीब विद्यार्थ्यांना दिवाळी भेट म्हणून कपडे वाटप करण्यात आले. यावेळी सुरेश क्षीरसागर, डी.आर. कुलकर्णी, विकास सोनटक्के, दुर्योधन कासार आदी.