शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

दिवाळी की दिवाळे ?

By admin | Updated: October 19, 2014 00:39 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील मतयंत्रात बंद झालेले निकाल रविवारी सकाळी आठपासून धडाधड बाहेर पडणार आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील मतयंत्रात बंद झालेले निकाल रविवारी सकाळी आठपासून धडाधड बाहेर पडणार आहेत. अत्यंत चुरशीने झालेल्या लढतीच्या निकालाचे फटाके फुटणार असल्याने मातब्बर नेत्यांसह १३८ उमेदवारांच्या भवितव्याचे दिवे लागणार आहेत. विधानसभेचे निकाल कोणाची दिवाळी साजरी करतात आणि कोणाचे दिवाळे काढतात, हे काही तासांमध्येच स्पष्ट होईल. गत चार दिवसांपासून सुरू असलेली धाकधूकही काही तासांमध्येच एकदाची संपणार आहे.जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातून १३८ उमेदवार आपले नशिब आजमावित आहेत. १५ आॅक्टोबरला त्यांचे भवितव्य मतयंत्रात बंद झाले. रविवारी (दि.१९)सकाळी आठपासून मतमोजणी सुरू होणार असल्याने शिगेला पोहोचलेली उत्कंठा दुपारपर्यंत संपुष्टात येईल. आघाडी आणि युती तुटल्यामुळे कधी नव्हे एवढ्या चुरशीने लढती झाल्या. सहकाराचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात यंदा प्रथमच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी धसका घेतला आहे, तर नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे भाजपाच्या उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नरम झालेली काँग्रेस, प्रथमच स्वबळावर निवडणूक लढविणारी शिवसेना यांच्यासमोर त्यांचे गड राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. युती-आघाडीच्या तुटीचा फायदा नेमका कोणाला होणार याचे राजकीय नेत्यांनी बांधलेले आराखडे सुटणार आहेत. जिल्ह्यातील माजी मंत्री मधुकरराव पिचड, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते, माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे किल्ले शाबित राहतात की ढासळतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपा आणि शिवसेनेत जाऊन उमेदवारी करणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. उत्तरेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली सभा सरस ठरणार की माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची अंडरग्राऊंड यंत्रणा कोणाचा निकाल लावणार?याचेही चित्र स्पष्ट होईल. बारा आमदारांपैकी किती आमदार आपले वर्चस्व कायम ठेवतात, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील आजी-माजी मंत्री, राज्याचे माजी मंत्री,सर्वच पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी प्रचार सभा घेवून जिल्हा ढवळून काढला. विकासाच्या मुद्द्यांपेक्षा आरोप-प्रत्यारोपांनी निवडणूक गाजली. त्याचा जिल्ह्यातील निकालावर प्रभाव राहणार की भाजपाच्या लाटेवर मतदार स्वार होणार,हे काही तासांमध्येच समोर येईल. दिवाळीआधीच निकालाचे फटाके फुटणार असल्याने कार्यकर्तेही दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान सर्व्हेचे आपटबार, सुरसुऱ्यांमुळे दोन-तीन दिवस सोशल मीडियावर चांगलेच मनोरंजन झाले. सर्व्हेचे अंदाज किती खरे होणार? याकडेही मतदारांचे लक्ष लागून आहे.(प्रतिनिधी)