शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

पुढील पाच दिवस जिल्हा कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 16:19 IST

अवर्षणग्रस्त असलेल्या अहमदनगर जिल्ह्याला यंदा पावसाअभावी बुरे दिन आले आहेत. येत्या पाच दिवसात पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे.

राहुरी : अवर्षणग्रस्त असलेल्या अहमदनगर जिल्ह्याला यंदा पावसाअभावी बुरे दिन आले आहेत. येत्या पाच दिवसात पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान खात्याने व्यक्त केला आहे़ त्यामुळे खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे़यंदा सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता़ मात्र प्रत्यक्षात दोन सव्वादोन महिन्यात पावसाने ठेंगा दाखविल्याने अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झोपा उडाल्या आहेत़ मुळा व भंडारदरा या धरणाशिवाय छोट्या, मोठ्या धरणात समाधानकारक पाणी साठा असला तरी पावसाने दडी मारली आहे़ याशिवाय जायकवाडीला पाणी जाण्याची भीती शेतकºयांना आहे़ दुसºया बाजूला ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ हवामानावर आधारित विद्यापीठाने शेतकºयांना सल्ला दिला आहे़ लाल बोंडअळी आढळून आल्यास कामगंध सापळे लावण्याचा शेतकºयांना सल्ला देण्यात आला आहे़ तापमान व आर्द्रतेच्या वाढीमुळे मूग व उडीद पिकांवर मावा, तुडतुडे व पांढरी माशी आढळून आल्यास डायमेथोएट ३० टक्के प्रवाही अथवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही १० मिली अथवा मिथील डिमेटॉन २५ टक्के प्रवाही ८ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे असा सल्ला विद्यापीठाने दिला आहे़सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादूर्भाव आढळून आल्यास १२ मिली ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे़ तूर या पिकावर शेंडे गुंडाळणारी अळी व पाने कुडतडणाºया अळीचा प्रादूर्भाव आढळून आल्यास क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही १६ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १४़५ टक्के प्रवाही ७ मिली किंवा स्पीनोसॅड ४५ टक्के प्रवाही तीन मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे़पावसाने ओढ दिल्याने पिके सुकलीबोटा : पावसाने ओढ दिल्याने संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर व परिसरातील गावांमध्ये खरीप हंगामातील पिकांसह माळरानावर चाराही सुकू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.पठारभागात सुरवातीला वळवाचा दमदार पाऊस झाला. मोसमी पावसाचे आगमन लांबले. यानंतर झालेल्या समाधानकारक पावसाचे ओलीवर बोटा, घारगाव, साकूर व इतर गावांमध्ये शेतकरी वर्गाने खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, मूग आदींसह कडधान्ये या पिकांच्या पेरण्या उरकल्या. सारोळेपठार नांदुर-खंदरमाळ व लगतच्या गावामध्ये लाल सेद्रीय कांदा पिकांच्या पेरण्याही झाल्या.दरम्यान पठारभागातील बहुतांश क्षेत्र हे पावसावरच अवलंबून आहे. त्यातच पावसाने काही दिवसांपासून ओढ दिल्याने साकूर उत्तर भागातील खांबे, वरवंडी, कौठे, मलकापूर, हिवरगाव पठार, रणखांब व लगतच्या गावांमध्ये खरीप पिके सुकू लागली आहेत. माळरानावरील चाराही सुकू लागला आहे.यामुळे या गावांमधील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर मुळा नदी परिसर व बोटा, घारगाव परिसरातील पिक परिस्थिती समाधानकारक असली तरी येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास खरीप हंगामावरच परिणाम होण्याची शक्यता आहे.भारत मौसम विज्ञान विभागाच्या अंदाजानुसार अहमदनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सीअस राहील़ किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सीअस राहील़ आकाश अंशत: ढगाळ राहील़ कमाल आर्द्रता ८८ ते ९० टक्के राहील़ किमान आर्द्रता ७१ ते ७३ टक्के राहील़ वाºयाचा ताशी वेग १३ ते १६ किलोमीटर राहील़ -रवींद्र आंधळे, सहयोगी प्राध्यापक, हवामान विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस