शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज देण्यास जिल्हा सहकारी बँकेची टाळाटाळ; २८ हजार शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 17:26 IST

अहमदनगर शासनाच्या आदेशाला अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने केराची टोपली दाखविली असून, कर्जमाफीची रक्कम जमा न झालेल्या शेतक-यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ चालविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २८ हजार शेतकरी यंदाच्या पीक कर्जापासून वंचित राहिले आहेत. 

अहमदनगर : शासनाच्या आदेशाला अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने केराची टोपली दाखविली असून, कर्जमाफीची रक्कम जमा न झालेल्या शेतक-यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ चालविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २८ हजार शेतकरी यंदाच्या पीक कर्जापासून वंचित राहिले आहेत. 

    कोरोनाच्या महामारीत महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत खंड पडू नये, शेतक-यांना नव्याने कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारने कर्जमाफीस पात्र शेतक-यांची यादी पोर्टलवर प्रसिध्द केली. त्यानुसार जिल्ह्यातील २८ हजार १६४ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. पात्र शेतक-यांना सरकारकडून येणे आहे, असे दर्शवून  पीक कर्ज वितरित करण्याचा आदेश सरकारने राज्यातील सर्व जिल्हा बँकांना दिला आहे.

   अन्य जिल्ह्यातील बँकांनी सदर शेतक-यांना पीक कर्ज वाटपास सुरुवात केली. परंतु, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने यापैकी एकाही शेतक-याला चालूवर्षी पीक कर्जाचे वाटप केले नाही. उलटपक्षी सरकारकडे याबाबत मार्गदर्शन मागविले असून, हे मार्गदर्शन अद्याप आलेले नाही.

    बँकेने मार्गदर्शनात वेळ घालविल्याने खरीप हंगाम सुरू होऊनही या शेतक-यांना पीक कर्ज मिळू शकले नाही़. विशेष म्हणजे सरकारच्या आदेशानुसार हे शेतकरी पीक कर्जास पात्र ठरले आहेत. शासनाच्या आदेशानुसार कर्ज वाटप झाले असते तर खरीप हंगामासाठी उधारी उसणवारी करण्याची वेळ शेतक-यांवर ओढावली नसती़. परंतु, जिल्हा बँकेने कर्ज वाटप न केल्यामुळे खरिपाचे पीक कसे उभे करायचे? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतक-यांसमोर आहे.

बँक म्हणते तांत्रिक अडचणकर्जमाफीची रक्कम जमा न झालेल्या शेतक-यांना पीक कर्ज देण्याचा आदेश प्राप्त झाला आहे. मात्र या शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण झालेले नाही. हे प्रमाणिकरण करताना कर्जमाफीची रक्कम मान्य आहे किंवा नाही, हे ठरविण्याचा अधिकार शेतक-यांना आहे.  शासनाच्या आदेशानुसार या शेतक-यांना पीक कर्ज दिले आणि शेतक-यांना कर्जाची रक्कम मान्य नसेल तर बँकेचे पीक कर्ज वसूल करताना अडचणी येतील. ही अडचण असल्याने याबाबत मार्गदर्शन मागविले असून, मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे बँकेकडून सांगण्यात आले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरbankबँकFarmerशेतकरी