तीसगाव : मोहोज बुद्रुक (ता. पाथर्डी) येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने सभासदांना आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते रविवारी लाभांशाचे वितरण करण्यात आले.
‘वृद्धेश्वर’चे ज्येष्ठ संचालक उद्धवराव वाघ, पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, पुरुषोत्तम आठरे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, पोपटराव कराळे, जे.बी. वांढेकर, सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी सुभाषराव वांढेकर, वृद्धेश्वर तालुका दूध संघाचे व्यवस्थापक राजेंद्र उगार आदी व्यासपीठावर होते.
सेवा संस्था या ग्रामीण भागातील शेतकरी व शेतीव्यवस्था यावर अवलंबून असणाऱ्या घटकांचा आर्थिक कणा आहे. सेवा संस्थांच्या माध्यमातूनच सहकारी चळवळ खऱ्या अर्थाने जिल्ह्यासह राज्यभर विकसित झाली असल्याचे आमदार राजळे यांनी सांगितले. सेवा संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब कराळे यांनी प्रास्ताविक केले. सचिव दिलीप सावंत यांनी आभार मानले.