शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

भुतकरवाडी शाळेची दैन्यावस्था : दोन खोल्यांमध्ये भरतात पाच वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 12:58 IST

बालिकाश्रम रोडवरील भुतकरवाडी येथील एकमेव शासकीय प्राथमिक शाळेची प्रशासकीय ढकलाढकलीत दैन्यावस्था झाली असून, दोन खोल्यांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरत आहेत.  

सोनल कोथिंबिरे - रोहिणी मेहेर

अहमदनगर : बालिकाश्रम रोडवरील भुतकरवाडी येथील एकमेव शासकीय प्राथमिक शाळेची प्रशासकीय ढकलाढकलीत दैन्यावस्था झाली असून, दोन खोल्यांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरत आहेत.  जिल्हा परिषद, महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वादावादीत या शाळेतील एका खोलीत भरणाऱ्या दोनपेक्षा अधिक वर्गांची खिचडी दुर्लक्षित झाली आहे़ लोकप्रतिनिधींनाही या शाळेकडे लक्ष देण्यास वेळ नाही. भुतकरवाडीच्या चौकातच छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक विद्यालय ही पाचवीपर्यंतची शाळा आहे. सुरुवातीला ही शाळा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे होती़ नंतर ती महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे हस्तांतरीतझाली. शाळेचे अधिकार महापालिकेकडे आले, पण इमारतीचे अधिकार जिल्हा परिषदेकडचे राहिले. त्यामुळे तेथे काहीही निर्णय घेता येत नाही, असे महापालिकेचे अधिकारी सांगतात.  ‘लोकमत’ने यापूर्वीही या शाळेची दुरवस्था मांडली होती. त्यावेळी पालिकेतील लोकप्रतिनिधींनी शाळेचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही दिली होती.  मात्र, अद्याप या शाळेचा प्रश्न सोडविण्याची तसदी ना प्रशासनाने घेतली ना लोकप्रतिनिधींनी. या द्विशिक्षकी शाळेची पटसंख्या ३७ असून, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षक तळमळीने शिकवितात. शाळेचे मुख्याध्यापक अरुण पवार व शिक्षिका प्रियंका उंडे यांनी शाळेचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. या शिक्षकांची तळमळ असूनही ते वादामुळे फार काही योगदान देऊ शकत नाही़ झाडे लावणे, परिसर स्वच्छ ठेवणे, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या सोयी-सुविधा पुरविण्याची कामे या शिक्षकांनी स्वत:च्या पगारातून खर्च करुन केली.भुतकरवाडीतील शाळेबाबत काय वाद आहेत, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी रमाकांत काठमोरे, गटशिक्षणाधिकारी रामदास हराळ यांना संपर्क केला. मात्र, आम्हाला काहीही माहिती नाही, तुम्ही पालिकेला विचारा असे सांगत दोघांनीही माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर महापालिकेचे प्रशासन अधिकारी संजय मेहेर यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क केला. जागेचा मालकी हक्क जिल्हा परिषदेकडे आहे, असे सांगत मेहेर यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. जागेचा मालकी हक्क मिळण्यासाठी महापालिकेने जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला किंवा नाही, याची माहितीही मेहेर यांच्याकडे उपलब्ध नव्हती. अधिका-यांनाही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न महत्वाचा वाटत नसल्याचे यातून दिसले तर लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका आणि जिल्हा परिषदेकडेही पाठपुरावा केला नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका