शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

असंघटित कामगारप्रश्नी आयटक कार्यकारिणीत चर्चा

By admin | Updated: September 21, 2016 00:27 IST

अकोले : येत्या नोव्हेंबरमध्ये जळगाव, सांगली, वर्धा येथे असंघटित कामगारांच्या होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात सहभागी होण्यासंदर्भात आयटकच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत

अकोले : येत्या नोव्हेंबरमध्ये जळगाव, सांगली, वर्धा येथे असंघटित कामगारांच्या होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात सहभागी होण्यासंदर्भात आयटकच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. ट्रेड युनियन सुधारण्याच्या नावाखाली भाजप सरकार कामगारांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणू पाहत असून येत्या काही दिवसात कामगारांचा लढा अधीक तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.तालुक्यातील डोंगरगाव येथे मंगळवारी ही बैठक झाली. आयटकचे राज्य सरचिटणीस शाम काळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत झालेले निर्णय सांगितले. यावेळी जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसळ (औरंगाबाद), कॉम्रेड शंकर पुजारी (सांगली), कॉम्रेड बबली रावत (मुंबई), कॉम्रेड माधुरी क्षीरसागर (परभणी), कॉम्रेड सुमन पुजारी (सांगली), कॉम्रेड रमेश सहस्त्रबुद्धे, कॉम्रेड राम बाहेती (औरंगाबाद), कॉम्रेड प्रकाश बनसोड, कॉम्रेड राजू देसले (नाशिक), कॉम्रेड नरेंद्र चंद्रय्या नोने (चंद्रपूर), कॉम्रेड शंकर न्यायपेल्ली (नगर), कारभारी उगले, शांताराम वाळुंज आदी उपस्थित होते. दि.२४ व २५ सप्टेंबर रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जळगाव येथे, दि.१५ व १६ आॅक्टोबर बांधकाम कर्मचाऱ्यांचे सांगली तेथे, तर १२ व १३ नोव्हेंबरला वर्धा येथे शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असून याबाबत विचारविनिमय करण्यात आला. असंघटित कामगारांचा लढा अधीक तीव्र करण्याबाबत ठराव संमत झाला. होणाऱ्या तीन राज्यस्तरीय अधिवेशानाची चर्चा झाली.केंद्रातील व राज्यातील भाजप युतीचे सरकार भांडवलदारधार्जिणे असून त्यांच्या विरोधातील आक्रोश मोर्चे आंदोलनांच्या माध्यमातून रस्त्यावर दिसत आहेत, असे स्पष्ट करत राज्यात होत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाला आयटकचा जाहीर पाठिंबा असल्याचे मनोहर टाकसाळ, शाम काळे यांनी सांगितले. मूकमोर्चात सध्या राजकारणी घुसत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी विडी कामगारांचे नेते कॉम्रेड कारभारी उगले यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)