अहमदनगर : ऐतिहासिक नगर शहरात महानगरपालिकेकडून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. माळीवाडा परिसरातील प्रभागाचे नेतृत्व महापौर करत आहेत. तरीही या भागाचा विकास झाला नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आळीपाळीने महापालिकेत सत्ता भोगत आहेत. नागरिकांना सुविधा देता आल्या नाहीत, तरीही निर्लज्जपणे निवडणुक लढवून मते मागत आहेत. या करंट्या सत्ताधा-यांना व दृष्टीहिन नेतृत्वाला दूर सारा, अशी टीका सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी शिवसेनेवर केली.माळीवाडा वेशीजवळ झालेल्या जाहीर सभेत मंत्री कांबळे बोलत होते. यावेळी आमदार भिमराव धोंडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी, अॅड.अभय आगरकर उपस्थित होते.कांबळे म्हणाले, तीन वर्षे पूर्ण अभ्यास करुन सरकारने मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय दिला आहे. आता हे आरक्षण कोर्टातही टिकणारे आहे. देशात, राज्यात परिवर्तन झाले आहे. सुरेश खरपुडे यांनी प्रास्तविक केले. श्रीकांत साठे यांनी आभार मानले.
...तरीही निर्लज्जपणे मते मागतात : दिलीप कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 16:04 IST