शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

Dhule, Ahmednagar Municipal Election Results: भाजपा पुन्हा 'मोठा भाऊ', पण महापौर ठरवणार 'छोटा भाऊ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 13:44 IST

अहमदनगरमध्ये बहुमतासाठी ३५ जागा आवश्यक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने २५ जागांपर्यंत मजल मारलीय, तर भाजपाला १८ आणि शिवसेनेला १७ जागांवर यश मिळताना दिसतंय.

ठळक मुद्देअहमदनगरमध्ये भाजपा 'मोठा भाऊ' ठरला आहे, पण महापौरपदाची खुर्ची त्यांना मिळू द्यायची का, हे 'छोटा भाऊ'च ठरवणार आहे. अपक्षांची मदत मिळाली तरी  काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी बहुमतापर्यंत पोहोचू शकत नाही.नगरमध्ये भाजपाचं राष्ट्रवादीशी 'कौटुंबिक सख्य' आहे.

चार वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपानं 'मोठा भाऊ' होण्याचा मान मिळवला खरा, पण 'छोट्या भावा'ला - अर्थात शिवसेनेला सोबत घेऊनच त्यांना सरकार स्थापन करावं लागलं होतं. आता अहमदनगर महानगरपालिकेतही भाजपा 'मोठा भाऊ' ठरला आहे, पण महापौरपदाची खुर्ची त्यांना मिळू द्यायची का, हे 'छोटा भाऊ'च ठरवणार आहे.    धुळे महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार, हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. ७४ पैकी ५० जागांवर त्यांनी मुसंडी मारलीय. परंतु, अहमदनगर महानगरपालिका निवडणूक निकालात कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाहीए. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने २५ जागांपर्यंत मजल मारलीय, तर भाजपाला १८ आणि शिवसेनेला १७ जागांवर यश मिळताना दिसतंय. अपक्ष आणि इतर सात जागांवर पुढे आहेत. 

अहमदनगरमध्ये बहुमतासाठी ३५ जागा आवश्यक आहेत. अपक्ष आणि इतर पक्षाच्या उमेदवारांची मदत मिळाली, तरी  काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तिथवर पोहोचू शकत नाही. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपाला  सत्ता स्थापन करायची असेल, तर शिवसेनेच्या १७ नगरसेवकांना सोबत घेतल्याशिवाय ते शक्य नाही. त्यामुळे आता स्वबळाचा नारा देणारी शिवसेना आपल्या 'जुन्या मित्रा'ला साथ देते का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. सत्ता हवी असेल तर भाजपाला पाठिंबा देण्याशिवाय सेनेकडेही पर्याय नाही.

भाजपा-राष्ट्रवादी एकत्र?

दुसरीकडे, नरेंद्र-देवेंद्र यांच्या नावाने रोज शंख करणाऱ्या शिवसेनेची साथ भाजपा घेणार का?, याबद्दलही उत्सुकता आहे. काही जणांच्या मते, नगरमध्ये भाजपाचं राष्ट्रवादीशी 'कौटुंबिक सख्य' आहे. भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची कन्या ही राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची पत्नी आहे. ती निवडणूक रिंगणात उतरली होती आणि विजयीही झाली आहे. त्यामुळे भाजपा नगरसेवक राष्ट्रवादीला पाठिंबा देऊन, शिवसेनेला हिसका आणि काँग्रेसला झटका देऊ शकतात, असंही समीकरण मांडलं जातंय. परंतु, लोकसभेच्या निवडणुकांचा विचार करता, ही जोखीम भाजपा पत्करणार का, याबद्दलही शंका आहे. कारण, भाजपा-शिवसेना युती होणारच, असं भाजपाध्यक्ष अमित शहांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सगळेच नेते ठामपणे सांगताहेत. म्हणजेच, नगरमध्ये शिवसेनेला बाजूला ढकलणं त्यांना परवडणारं नाही. त्यामुळे, 'आपण दोघे भाऊ-भाऊ' हे गाणं नगरमध्ये ऐकू येण्याचीच शक्यता जास्त आहे. 

LIVE UPDATES साठी खालील लिंकवर क्लिक करा....  

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकDhule Municipal Election 2018धुळे महानगरपालिका निवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा