शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कुणाच्या मेहेरबानीने नाही, जनतेच्या आंदोलनातून अकोले तालुक्यात विकास; या शेतकरी नेत्याने व्यक्त केले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 15:45 IST

अकोले तालुक्यातील जनतेने कुणाच्या मेहरबानीनं नाही तर मोर्चे, सत्याग्रह आंदोलन करून विकास पदरात पाडून घेतला आहे. कष्ट करणारे उपाशी आणि ऐतखाऊ तुपाशी ही  स्थिती बदलून तालुक्यात विकासात्मक बदलाची परिचिती यावी असे काम आमदार लहामटे यांनी करून दाखवावे. घराणेशाही, सरंजामशाही विरोधात येथील राजकारण असून अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर जनता माफ करणार नाही, असा इशारा ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी दिला. 

अकोले: अकोले तालुक्यातील जनतेने कुणाच्या मेहरबानीनं नाही तर मोर्चे, सत्याग्रह आंदोलन करून विकास पदरात पाडून घेतला आहे. कष्ट करणारे उपाशी आणि ऐतखाऊ तुपाशी ही  स्थिती बदलून तालुक्यात विकासात्मक बदलाची परिचिती यावी असे काम आमदार लहामटे यांनी करून दाखवावे. घराणेशाही, सरंजामशाही विरोधात येथील राजकारण असून अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर जनता माफ करणार नाही, असा इशारा ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी दिला. 

अकोले तालुका विधानसभेची पिचड घराण्याची ४० वर्षांची एकहाती सत्ता २४ आॅक्टोबर २०१९ ला संपुष्टात आली. ही किमया आम जनतेने करून दाखविली. यानिमित्त शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय वर्षपूर्ती सोहळ्यात सावंत बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी संदीप वर्पे होते. आनंद सोहळ्याच्या निमित्ताने भाजप सोडून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची आत्मचिंतन बैठक पार पडली.  

निसर्ग पर्यटनक्षेत्राचा विकास, रोजगारासाठी होणारी भटकंती थांबविणे व सरकारी सुसज्ज आरोग्यसुविधा उपलब्ध होणे ही तालुक्याच्या जनतेची खरी भूक आहे. त्यासाठीच परिवर्तन घडले हे लक्षात घेऊन विकासात्मक बदल घडून दाखवा मगच  विजयाचा  ढोल वाजवा. जमिनीवर पाय ठेवून आर्थिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न करताना तालुक्यातील सामाजिकएकीची घडी बिघडू देवू नये, असा सल्लाही सावंत यांनी आमदार किरण लहामटे यांना दिला. 

  अन्यायाविरुध्द  उभे राहणे हा माझा स्थायीभाव आहे. जातीभेदाच्या राजकारणाला थारा देणार नाही. तालुक्यातील विकासाचा बॅकलॉग  भरून काढून तरुणाईचे औद्योगिक वस्तीचे स्वप्न पूर्ण करील. वरिष्ठांच्या सहकार्याने पथदर्शी विकास कामांचा आलेख उंचावण्याचे काम सुरु आहे. संगमनेरच्या धरतीवर तालुक्यातील सहकारी संस्थांची घडी बसवू माझ्या काळात मंजूर कामांचेच उदघाटने  करतो. माजी आमदारांनी आपले नाकर्तेपण झाकण्यासाठी आरोप करू नये, असे  आमदार लहामटे यावेळी म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण