शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वंचित बहुजन आघाडीचे स्मशानभूमीत सरण रचून आंदोलन, हाथरस प्रकरणाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 14:07 IST

हाथरस प्रकरणाचे तीव्र पडसाद देशभर उमटले आहे. नगरमध्येही आज वंचित बहुजन आघाडीने स्मशानभूमीत आंदोलन केले. यावेळी संघटनेने विविध मागण्या केल्या.

अहमदनगर : वंचित बहुजन आघाडी ने आज स्टेशन रोडवरील स्मशानभूमीत आंदोलन करत हाथरस प्रकरणाचा निषेध केला. यावेळी योगी सरकारच्या विरोधात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच स्मशानभूमीत सरण रचत तेथे बसण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळी त पोलिसांनी त्यांना अडवले.

हाथरस प्रकरणाचे तीव्र पडसाद देशभर उमटले आहे. नगरमध्येही आज वंचित बहुजन आघाडीने स्मशानभूमीत आंदोलन केले. यावेळी संघटनेने विविध मागण्या केल्या. सदर खटल्याची सर्वोच्च न्यायालयातील न्यायमुर्तीमार्फत विशेष चौकशी समिती गठित करावी.  ३० दिवसाच्या आत चार्जशीट (दोषारोप  पत्रा) तयार करण्यात यावे, सदर खटला उत्तरप्रदेश बाहेर मुंबई , चेन्नई , कोलकाता अथवा दिल्ली उच्च न्यायालयात चालविण्यात यावा, पीडित मुलीचा अंतिम संस्काराच्या नावाखाली महत्वपुर्ण पुर्नतपासणीचे पुरावे नष्ट केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व त्यांना आदेशीत करणा-या मंत्र्यावर ३०२,१२० अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी. या घटनेतील फिर्यादी व त्यांचे कुंटुबीय व साक्षीदारांना संपुर्ण संरक्षण देण्यात यावे. वरील सर्व मागण्या मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या सुचनेने जिल्हयासह राज्य भारत तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल , असा इशारा युवक जिल्हाध्यक्ष सागर भिंगारदिवे, शहर जिल्हा महासचिव सुनिल शिंदे,  विजय गायकवाड, विनोद गायकवाड, जीवन कांबळे, संदिप गायकवाड यांनी दिला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार