शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांनी श्रीगोंदा पोलिसांना दाखविले लुटीचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 14:45 IST

पोलीस पथकाने बुधवारी यातील तीन आरोपींना हिरडगाव आणि कोकणगाव येथे नेले. या तिन्ही आरोपींनी कशा पद्धतीने गुन्हा केला, कोणी दरवाजा तोडला, कोणी मारहाण केली याची सविस्तर माहिती दिली. तेथून दरोडेखोरांच्या टोळीने शिंदे यांच्या घराचा दरवाजा तोडून अर्धा तास अक्षरश: धुडगूस घातला.

श्रीगोंदा : साहेब, आम्ही हिरडगाव, घोडेगाव, श्रीगोंदा शहर, लोणीव्यंकनाथ, घोगरगावमध्ये चो-या, दरोडे टाकले. असं आलो, अशी मारहाण केली आणि दम देऊन सोने, पैसे लुटून असं पळालो, अशी माहिती सांगत चक्क या दरोडेखोरांनी पोलिसांना लुटीचेच प्रात्यक्षिक दाखविले. बुधवारी पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार व सहका-यांसमोरच चोरट्यांनी दरोड्याचे प्रात्यक्षिक दाखविले.पोलीस पथकाने जेरबंद केलेल्या आरोपींनी हिरडगाव आणि कोकणगाव येथील दरोडा आणि श्रीगोंदा शहरातील परहार चोरी कशा पद्धतीने केली हे दाखविले. यावेळी दरोडेखोरांनी बनवाबनवी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, त्यांच्या सहका-यांनी त्यांना खाकी वर्दीचा इंगा दाखविला. पोलीस पथकाने बुधवारी यातील तीन आरोपींना हिरडगाव आणि कोकणगाव येथे नेले. या तिन्ही आरोपींनी कशा पद्धतीने गुन्हा केला, कोणी दरवाजा तोडला, कोणी मारहाण केली याची सविस्तर माहिती दिली. तेथून दरोडेखोरांच्या टोळीने शिंदे यांच्या घराचा दरवाजा तोडून अर्धा तास अक्षरश: धुडगूस घातला. पोलीस आल्याने आम्ही पळून गेलो असेही या आरोपीने यावेळी सांगितले. वातावरण शांत झाल्यानंतर आम्ही मोटारसायकली घेऊन पसार झाल्याचे सांगितले.श्रीगोंदा शहरातील परहार, तहसीलदार, पोलीस, अ‍ॅड.अनभुुले यांच्या घरी कशी चोरी केली, त्या ठिकाणी किती सोने, पैसे मिळाले हेही त्यांनी सविस्तर सांगितले. दोन दिवसात लोणीव्यंकनाथ, घोगरगाव येथे तपासासाठी आणण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

पावल्याने डोक्यात घातला गज

फरारी पावल्या काळे याने हिरडगाव येथील राणी दरेकर हिच्या डोक्यात गज घातला. तर शाहरुख आरकस काळे याने सोने लंपास केले. कोकणगाव येथील शिंदे यांना पैसे द्या, अन्यथा तुमच्या मुलीला पळवून नेऊ, अशी धमकी दिल्याची कबुली अल्पवयीन आरोपीने दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाPoliceपोलिस