शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

मोदी सरकारकडून लोकशाही पायदळी : अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 10:36 IST

लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गेल्या साडेचार वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहे.

राळेगणसिद्धी : लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गेल्या साडेचार वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहे. सर्वोच्च न्यायालय, लोकसभा, राज्यसभा अशा संवैधानिक संस्थांच्या निर्णयाचे पालनही ते करीत नाहीत. त्यामुळे या सरकारची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. हा लोकशाहीसाठी मोठा धोका आहे, अशा तीव्र शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर टीका केली.अण्णा हजारे हे महात्मा गांधी पुण्यतिथीपासून (३० जानेवारी )लोकपाल, लोकायुक्त कायदा, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी राळेगणसिद्धी येथे उपोषण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना बुधवारी पत्र पाठवून आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या. हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, देशात वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी २०११ साली कोट्यवधी जनता रस्त्यावर उतरली. त्यानंतरही वेळोवेळी आंदोलनानंतर २० डिसेंबर २०१३ रोजी लोकपाल,लोकायुक्त कायदा मंजूर झाला. भाजपचे सरकार केंद्रात मे २०१४ मध्ये सत्तेत आले. त्यानंतर लोकपाल, लोकायुक्त कायद्याची तत्काळ अंमलबजावणी गरजेची होती. २०१९ मध्ये केंद्र सरकारला सत्तेत येऊन पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याची वेळ आली.तरीही या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने फटकारले तरीही सरकार लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करायला तयार नाही. सर्वोच्च न्यायालयासारख्या संविधानिक संस्थांच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करणारे सरकार हे लोकशाही सरकार आहे काय?असा प्रश्न उपस्थितहोतो.आपले सरकार महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना मानते. परंतु या महान नेत्यांनी सत्याचा जीवनात अंगीकार केला होता, त्या सत्याकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. सरकारने वेळोवेळी खोटे बोलणे सहन होऊ शकत नाही. त्यामुळे, महात्मा गांधी पुण्यतिथीपासून राळेगणसिद्धी येथे उपोषण आंदोलन करणार आहे, असे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.लोकपाल,लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीचे मतदारांना दिलेले आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाळले नाही. सत्तेत येण्यापूर्वी मोदी हे समाज व देशाची सेवा करतील असे वाटत होते. परंतु, देशासाठी खरा नेता मिळाला नाही. सत्तेसाठी सत्य सोडण्यामुळे माझा मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास उडाला आहे. - अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे