मढीतील ग्रामसेवकाच्या बदलीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:22 IST2021-09-11T04:22:50+5:302021-09-11T04:22:50+5:30

तिसगाव : ग्रामसेवक मनमानी करतात. लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत सदस्यांनाही कामकाज करताना विश्वासात घेत नाहीत. नैमित्तिक कामांतही रहिवाशांकडून आर्थिक अपेक्षा ...

Demand for replacement of Gram Sevak in Madhi | मढीतील ग्रामसेवकाच्या बदलीची मागणी

मढीतील ग्रामसेवकाच्या बदलीची मागणी

तिसगाव : ग्रामसेवक मनमानी करतात. लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत सदस्यांनाही कामकाज करताना विश्वासात घेत नाहीत. नैमित्तिक कामांतही रहिवाशांकडून आर्थिक अपेक्षा करतात. त्यामुळे त्यांची येथून तत्काळ बदली करा, अशी मागणी श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) चे सरपंच व कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

मढी येथे कानिफनाथ देवस्थान असल्याने भाविकांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे नागरी समस्यांसह भाविकांच्या सोयी सुविधांबाबत सजग राहावे लागते. परंतु, याबाबत ग्रामसेवक गांभीर्याने घेत नाहीत. कार्यालयीन वेळेतही ते उपस्थित नसतात. त्याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच, उपसरपंच यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यासही प्रतिसाद दिला जात नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची पाहणी व पंचनामे करण्याचे कामांसाठीही अनास्था दाखविली जाते, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Demand for replacement of Gram Sevak in Madhi