शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

दानवे आचारसंहितेच्या कचाट्यात :प्रचारसभेत ३०० कोटींचा उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:35 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवाराने आचारसंहिता भंगाची तक्रार केल्याने दानवे अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.

अहमदनगर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवाराने आचारसंहिता भंगाची तक्रार केल्याने दानवे अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. नगरमध्ये भाजपला सत्ता दिली तर ३०० कोटींचा निधी देऊ, असे विधान त्यांनी नगरमधील प्रचारसभेत केले होते. त्यासंदर्भात प्रभाग १२मधील अपक्ष उमेदवार केतन गुंदेचा यांनी दानवे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.दानवे यांच्या उपस्थितीत गेल्या रविवारी भाजप प्रचाराचा प्रारंभ सावेडीतील भिस्तबाग चौकात झाला. त्यावेळी आयोजित सभेत त्यांनी ३०० कोटींच्या निधीचा उल्लेख केला. भाजपा सत्तेवर आल्यानंतर पुणे शहरात विमानतळ आणले आणि त्यासोबत मेट्रोही आणली़ सरकारकडे पैशांची कमी नाही़ केंद्र आणि राज्यातून आलेला पैसा आपल्या गल्लीपर्यंत आणायचा असेल तर भाजपाच्या प्रामाणिक नगरसेवकांना निवडून द्या. नगर शहराचा महापौर भारतीय जनता पार्टीचा करा, याच व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांना आणून नगर शहराच्या विकासासाठी ३०० कोटी रुपये देतो, अशी घोषणा त्यांनी केली. या त्यांच्या विधानावरच प्रभाग १२मधील अपक्ष उमेदवार केतन गुंदेचा यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांचे हे वक्त्यव्य म्हणजे मतदारांसाठी प्रलोभन आहे. शहरात महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यात दानवेंची ही घोषणा म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार गुंदेचा यांनी निवडणूक निर्णय अधिका-यांकडे केली आहे.दरम्यान, आचारसंहिता भंगाच्या अनेक तक्रारी आचारसंहिता कक्षाकडे दाखल झाल्या असून त्यावर कार्यवाही सुरू आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त जे. एस. सहारिया उद्या ( शुक्रवारी ) नगर दौºयावर येत असल्याने ते या तक्रारींवर काय कार्यवाही करतात, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका