शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

मनाची प्रसन्नता आणि संस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:47 IST

मनाची प्रसन्नता ही संस्कार, दिनचर्या यावर आपले आदर्श जीवन अवलंबून असते. आपण सतत द्वेषमूलक वातावरणात मन प्रसन्न रहाणार नाही. मुले हे अनुकरण प्रिय असतात.

अध्यात्म/ राधेश्याम कुलकर्णी / मनाची प्रसन्नता ही संस्कार, दिनचर्या यावर आपले आदर्श जीवन अवलंबून असते. आपण सतत द्वेषमूलक वातावरणात मन प्रसन्न रहाणार नाही. मुले हे अनुकरण प्रिय असतात. सर्वात प्रथम ते आपल्या आई, वडिलांच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण करतात. त्याप्रमाणे अनुकरण करतात. त्यानंतर शिक्षकांचे अनुकरण करतात. त्यामुळे केवळ उपदेशाने संस्कार घडत नाहीत तर त्यांच्या समोर आदर्श असायला हवे आहेत. मनाला चांगल्या सवयी, संस्कार होण्यासाठी फार काही अवडंबर करण्याची आवश्यकता नसते. मात्र दुष्परिणाम करणा-या गोष्टींचा प्रयत्नपूर्वक त्याग करण्याचा मनाचा निग्रह व चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा आग्रह म्हणजे संस्कार. करिअरच्या स्पर्धेच्या काळात सहज संस्कार कसे घडवता येतील, या बाबत जागृत राहण्याची जबाबदारी  पालक व शिक्षक यांच्यावर येते. कुटुंबात मुलांशी संवाद, आदर्श व्यक्तिंचे चरित्र गोष्टी त्यांना सांगणे, एकत्रित भोजन, नियमित संस्कारक्षम पाठांतर हसत खेळत करुन घेणे यामुळे सहज संस्कार होतात. त्यातून मनप्रसन्नतेची अनुभूती घेता येते.  चांगल्या सवयी जर का मनाला लावल्या तर ते त्यापासून दूर जात नाहीत. मग त्या मनाची प्रसन्नता घालविण्यासाठी कुठल्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तरी फरक पडत नाही. समर्थ रामदासांनी मनोबोध किंवा मनाचे श्लोकाव्दारे मनावर संस्कार कसे व्हावेत, याचा वस्तूपाठच सांगितला आहे.मना वासना दृष्टकामा नये रे मना सर्वथा पापबुध्दी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो, मना पाप संकल्प सोडूनी द्यावा मना सत्यसंकल्प जीवी धरावा, धावत्या युगात आई, वडिल, शिक्षक, सर्वांनाच स्वत:चे मन व्यवस्थापन सांभाळीत पिढी घडवण्याचे आव्हान आहे. त्यासाठी आपल्या व मुलांच्या करिअरमधील थोडा दैनंदिन वेळ संस्कारासाठी काढावा लागेल. संत चरित्र, राष्ट्रपुरुषांचे चरित्र, आदर्श कथा मुलांना सांगव्या लागतील त्या सांगण्यासाठी आपल्याला वाचाव्या लागतील. एक उपक्रम देखील राबवता येऊ शकतो. सेवानिवृत्त, अनुभवी, वेळ उपलब्ध असलेल्या बंधू भगीनिंनी  आपल्या परिसरातील लहानग्यांना एकत्रित करुन रोज किंवा साप्ताहिक एक तासाचा विनामूल्य संस्कार वर्ग सुरू केल्यास नातवंडांवर संस्कार करीत आपले आयुष्य हसरे करता येईल. आयुष्यात प्रत्येकाला यशस्वी व्हायचय हे खरं. प्रत्येकाच्या यशाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. परंतु सर्वांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एक मध्यम मार्ग समर्थांनी सांगितला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिकcultureसांस्कृतिक