कर्जत : सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी पावसाने कर्जत तालुक्यात सरासरी ओलांडली. समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला. जलयुक्त शिवारच्या कामांचा कर्जतकरांना फायदा झाला. सतत दुष्काळाने पिचलेला हा तालुका यावर्षी दुष्काळमुक्त झाला. कर्जतच्या स्मशानभूमीला पाण्याने वेढले आहे. दिघी येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत पडली. राक्षसवाडी खुर्द येथील कर्जत श्रीगोंदा रस्त्यावरील लोहकरा नदीवरील पूल वाहून गेला. यामुळे या भागाचा श्रीगोंद्याशी संपर्क तुटला. बहिरोवाडीच्या शेतकऱ्यांनी गेल्या सात वर्षांचा दुष्काळ हटल्यानंतर आता पाणी जपून वापरत ऊस पीक न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.सरासरीच्या १२२ टक्के पाऊस झाला. सात वर्षानंतर प्रथमच तालुक्यातील नद्या, ओढे वाहत आहेत. सुरू असलेल्या पावसामुळे नद्या वाहू लागल्या आहेत. तालुक्यातील थेरवडी, दुरगाव, बहिरोबावाडी, गायकरवाडी,आळसुदा येथील तलाव भरुन वाहात आहेत. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे कर्जत परिसरातील दोन्ही नद्यांना पाणी आले आहे. या नद्यांवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. नदी व बंधाऱ्यांमधील पाणी पाहण्यासाठी सोमवारी सकाळी कर्जतकरांनी मोठी गर्दी केली होती. अचुक हवामान वर्तविणारे प्रकाश यादव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच बळीराम यादव,प्रभाकर लाळगे, रामेश्वर तोरडमल, नितीन तोरडमल,संदीपान तोरडमल,ज्ञानेश्वर यादव आदी हजर होते. बहिरोबावाडी तलाव सात वर्षानंतर प्रथमच भरला. या पाण्याचे जलपूजन ग्रामस्थांनी केले. यावेळी येथील ग्रामस्थांनी गेली सात वर्षे सततचा दुष्काळ केल्यानंतर यावर्षी समाधानकारक पाऊस झाला़
बहिरोबाडीत ऊस न घेण्याचा निर्णय
By admin | Updated: October 4, 2016 00:42 IST