शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

मृत समजून वर्षश्राद्ध घातलेला मुलगा तीन वर्षांनी परतला घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 22:26 IST

तरुणाच्या नातेवाईकांचा सोशल मिडीयाच्या माध्यमातून शोध घेतला

 अहमदनगर - छत्तीसगड राज्यातील कोरीया जिल्हातील साहू नावाचा तरुण तीन वर्षापासून गायब होता. तो मरण पावला हे गृहीत धरून घरच्यांनी छोटूचे वर्षश्राध्द घातले. मात्र तीन दिवसापुर्वी  गहाळ अवस्थेत तो मढेवडगाव शिवारात आढळला. ग्रामपंचायत सदस्या पूजा साळवे, राहुल साळवे या दाम्पत्यांनी या तरुणाला घरी आणले. या तरुणाच्या नातेवाईकांचा सोशल मिडीयाच्या माध्यमातून शोध घेतला आणि आई-वडिलांना त्यांचा मुलगा अखेर मिळाला. याचा आनंदोत्सव मंगळवारी छत्तीसगढला साजरा झाला.मढेवडगाव-श्रीगोंदा रस्त्यालगत मढेवडगाव शिवारात रस्त्याच्या बाजूला एक १६ ते १७ वर्ष वयोगटातील तरुण मागच्या आठवड्यात जखमी अवस्थेतदिसून आला. या तरुणाला अक्षय ससाणे व इतर मित्रांच्या मदतीने डॉ. प्रविण नलगे यांच्या दवाखान्यात घेऊन गेले. डॉ. नलगे यांनी तरुणावर मोफत उपचार केले. राहुल साळवे यांनी तरुणाला आपल्या घरी नेऊन चौकशी केली. त्याच्या संवादावरून तो छत्तीसगड राज्यातील कोरीया जिल्हातील असल्याचे निष्पन्न झाले.तरुणांनी गुगलच्या माध्यमातून संपर्क क्रमांक मिळविले. कोरिया जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक चंद्रमोहन सिंग यांना याची माहिती दिली. तत्काळ चक्र फिरल्याने तो तरुण तीन वषार्पासून बोपत्ता असल्याची नोंद पोलिस स्टेशनला मिळाली.मढेवडगावकरांनी या मतीमंद छोटुला कपडे घेतले. आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये बसवून दिले आणि तेथील पोलिसांना माहीती दिली. छोटू छत्तीसगडमध्ये पोहताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. छोटूला नातेवाईकांच्या ताब्यात देताना हेडकॉन्स्टेबल नारायणसिंह हे तरुणाच्या घरी जाऊन राहुल साळवे यांच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल करून तरुणाशी व घरच्यांशी त्यांचे बोलणे करुन दिले. त्यावेळी सदर तरुणाला व त्याच्या घरच्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान या छोटूचा मृत्यू झाल्याचे समजून त्याचे घरच्यांनी वर्षश्राद्धही घातले होते. मात्र त्याला जीवंत पाहून घरच्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. छत्तीसगड कोरिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी राहुल साळवे,अभय गुंड, प्रा. योगेश मांडे, सचिन ससाणे, राहुल साळवे, सनी कोळपे, अंबादास मांडे, गोरख शिंदे, गोरख उंडे व मढेवडगावकरांचे आभार मानले व कोरिया भेटीचे निमंत्रण दिले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJara hatkeजरा हटके