शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधात्मक आदेशाची मुदत १४ एप्रिलपर्यंत वाढविली जिल्हाधिका-यांच्या सूचना : माध्यमांचा अत्यावश्यक सेवेत समावेश, वृत्तपत्रविक्रेत्यांना देणार ओळखपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 09:39 IST

कोरोना विषाणूचा  प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्याच्या प्रतिबंधात्मक आदेशाची मुदत जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी १४ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.

अहमदनगर : कोरोना विषाणूचा  प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्याच्या प्रतिबंधात्मक आदेशाची मुदत जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी १४ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. माध्यमांचा अत्यावश्यक सेवेत समावेश होत असल्याने वृत्तपत्रसेवा सुरू राहणार असून वृत्तपत्र विक्रेत्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहेत.जिल्हा महसूलस्थळ सीमेच्या हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर, गल्लोगल्ली संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे,  रेंगाळणे असे कृत्य करण्यास जिल्हाधिकाºयांनी २३ मार्च ते ३१ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. तेच आदेश आता १४ एप्रिलपर्यंत वाढवले आहेत.सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव, उरुस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा व इतर सर्व स्पर्धा,  कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग,  बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, देशांतर्गत व विदेशी सहली यांना या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे. कार्यक्षेत्रात असणारी दुकाने सेवा आस्थापना, उपहारगृह, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग  कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब-पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, खासगी शिकवणी वर्ग, व्यायाम शाळा, संग्रहालय बंद राहतील, असे या आदेशात म्हटले आहे.....यांना आदेशातून सूटशासकीय, निमशासकीय कार्यालय, सरकारी महामंडळाचे उपक्रम, आस्थापना, बँक, एटीएम, विमा सेवा, अत्यावश्यक सेवांमधील व्यक्ती,  रुग्णालय, पॅथॉलॉजी, लॅबोरेटरी, दवाखाने, रूग्णवाहिका, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, विमानतळ, रिक्षा थांबे, अंत्यविधी (गर्दी टाळून), अत्यावश्यक किराणा सामान, दूध दुग्धोत्पादने , फळे व भाजीपाला, औषधालय, गॅस वितरण सेवा, पेट्रोल पंप (पेट्रोल सकाळी ५ ते ९/ डिझेल विक्री सकाळी ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत),  जीवनावश्यक वस्तू, विक्री वितरीत व वाहतूक करण्यास परवानगी राहील. प्रसारमाध्यमांची कार्यालये (सर्व  प्रकारचे दैनिक, नियतकालिके, टी व्ही, न्यूज चॅनेल), दूरसंचार, पोस्ट व इंटरनेट सेवा पुरविणाºया आस्थापना, चिक्स, चिकण व अंडी दुकाने, जनावरांचे खाद्य-खुराक, पेंड विक्री दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने, पशु औषधालय दुकाने व वाहतूक सेवा चालू राहील.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारHealthआरोग्य