शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाची तारीख पे तारीख; गडकरीही करणार नाहीत भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 12:33 IST

अहमदनगर : शहरातील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाची १४ आॅक्टोबरनंतर जाहीर झालेली २९ आॅक्टोबरची तारीख म्हणजे पुन्हा एकदा फुसका बार ठरला आहे. ...

अहमदनगर : शहरातील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाची १४ आॅक्टोबरनंतर जाहीर झालेली २९ आॅक्टोबरची तारीख म्हणजे पुन्हा एकदा फुसका बार ठरला आहे. २९ आॅक्टोबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जिल्ह्यात येणार असले तरी ते उड्डाणपुलाचे भूमिपूजन करणार नाहीत. पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रत्यक्ष काम सुरु झाल्यानंतर भूमिपूजन करण्यात येणार आहे, असे सांगून आता पुढच्या तारखीची प्रतीक्षा वाढवली आहे.केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने मुंबईत बैठक घेतल्यानंतर खासदार दिलीप गांधी यांनी १४ आॅक्टोबरला उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी २९ आॅक्टोबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार असल्याची नवी तारीख जाहीर केली होती. मात्र गडकरी हे २९ आॅक्टोबरला संगमनेर, शनि शिंगणापूरच्या दौ-यावर असून त्यांनी नगरकडे पाठ फिरवली असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये झालेल्या महापौरांच्या फराळ कार्यक्रमात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी उशीर झाला तरी प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतरच भूमिपूजन होईल, असे स्पष्ट केले. उड्डाणपूल होणारच आहे. मात्र सर्व प्रक्रिया व प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर भूमिपूजन होईल, अशी ग्वाही दिली. त्यामुळे २९ आॅक्टोबरला उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार नसल्याचे स्पष्ट झाले.

खासदारांचा थाट... पालकमंत्र्यांचा स्नेहाचा ‘पूल’

खा. दिलीप गांधी यांनी आयोजित केलेल्या फराळ कार्यक्रमास पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी हजेरी लावून आपसातील ‘स्नेह’ वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले. शहराच्या आस्थेचा विषय असलेल्या उड्डाणपुलाबाबत पालकमंत्र्यांनी मात्र तेथे ‘ब्र’ही काढला नाही. महापौर सुरेखा कदम यांच्याकडील फराळ कार्यक्रमात मात्र उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाबाबत पालकमंत्र्यांनी ग्वाही दिल्याने शिवसेनेचाही ऊर भरून आला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी स्नेहाचा पूल नेमका कुठे बांधला? याची चर्चा सुरू झाली. खासदार गांधी यांच्याकडील फराळ कार्यक्रम म्हणजे शाही लग्नाचाच थाट होता. हा थाटमाट पाहून कर्डिलेही चांगलेच भारावले. हा शाही थाट पाहून ‘पुढच्या वेळीही तुम्हीच खासदार होणार. कामाची दखल घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागावी’ अशी शुभेच्छा देण्यासही कर्डिले विसरले नाहीत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar overbrigeअहमदनगर उड्डाणपूलRam Shindeराम शिंदे