संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक आणि प्रक्रिया संघात शनिवारी (दि. १८) बॉयलर आणि स्वयंचलित कन्व्हेयर सिस्टिमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महानंद, संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख होते. ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, उपाध्यक्ष साहेबराव गडाख, गणपतराव सांगळे, संचालक लक्ष्मणराव कुटे, आर. बी. रहाणे, मोहनराव करंजकर, विलास वर्पे, डॉ. गंगाधर चव्हाण, बाबासाहेब गायकर, विलास कवडे, संतोष मांडेकर, अण्णासाहेब राहिंज, पांडुरंग सागर, माणिक यादव, राजेंद्र चकोर, सुभाष आहेर, सुभाष गुंजाळ, कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे, वित्त अधिकारी जी. एस. शिंदे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या पाठपुराव्यातून राज्यात दररोज दहा लाख लिटर दुधाची पावडर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा ऐतिहासिक निर्णय घेत शेतकऱ्यांना मोठी मदत केली. आर्थिक शिस्त, पारदर्शकता, काटकसर या त्रिसूत्रीवर संगमनेरचा सहकार कार्यरत असून ते राज्याला दिशादर्शक ठरले आहे. राजहंस दूध संघाने सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत खर्चात बचत केली आहे. याचबरोबर प्रशासनाने दूध विक्री वाढ यावर अधिक भर द्यावा. याप्रसंगी
विनायक वैद्य, रमेश कोळगे, बाळासाहेब बडे, शरद केकान, भाऊसाहेब आहेर, सुरेश जोंधळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अध्यक्ष देशमुख यांनी केले, सूत्रसंचालन ॲड. सुरेश जोंधळे व नामदेव कहांडळ यांनी केले. संघाचे उपाध्यक्ष गडाख यांनी आभार मानले.