शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह चार जण पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 10:03 IST

शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देकेडगाव हत्याकांड : तीन आमदारांसह ३० जणांविरोधात गुन्हा

अहमदनगर - शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आमदार संग्राम जगताप यांना ताब्यात घेतले असून भानुदास कोतकर आणि बाळासाहेब कोतकर या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या हत्येप्रकरणी दुहेरी हत्याकांडप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप,  भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अन्य ३० जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी सायंकाळी सहा वाजता केडगाव येथील सुवर्भण नगर येथे भर चौकात संजय कोतकर व वसंत ठुबे यांना  ठार मारण्यात आले. या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी सुवर्णनगर येथे दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर संतप्त जमावाने पोलीस वाहनांवरही दगडफेक केली.  संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे केडगाव येथील सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. याचवेळी हल्लेखोरानी रिव्हॉलव्हरमधून गोळीबार केला.  गोळीबाराच्या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. संतप्त जमावाने परिसरातील वाहनांवर जोरदार दगडफेकीला सुरूवात केली. यावेळी स्थानिक व्यवसायिकांनी व रहिवाशांनी घरे व दुकाने बंद करून घेतली. त्यानंतर नगर शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, माजी महापौर संदीप कोतकर, भानुदास कोतकर यांच्या सांगण्यावरुन  विशाल कोतकर, औदूंबर कोतकर, बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ, रवी खोलम, अशोक कराळे, नवनाथ कराळे, मोहसीन शेख, विजय कराळे, रमेश कोतकर, शरद जाधव, संदीप गिर्हे, दादा येणारे, विनोद लगड, मनोज कराळे, मयूर राऊत, वैभव वाघ, शरद लगड, स्वप्नील पवार, संकेत लगड, बाबासाहेब कोतकर, राजू गंगड, अप्पा दिघे, बाबूराव कराळे यांच्यासह पाच ते सहा जणांनी कट, कारस्थान करून संजय कोतकर व वसंत ठुबे यांना गोळ्या घालून व कोयता तलवारीने मारल्याचे या फिर्यादित  म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी ३० जणांसह इतर ५ ते ६ जनांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSangram Jagtapआ. संग्राम जगतापShivaji Kardileyआ. शिवाजी कर्डिलेArun Jagtapआ. अरुण जगताप