शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या शेतकऱ्याने केली जंगली कर्टुल्याची शेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 03:00 IST

मधुमेह रुग्णांसाठीही उपयुक्त भाजी; जंगलातून कंदमुळे आणून उभे केले पीक

- सुधीर लंके अहमदनगर : कर्टुले ही जंगली वनस्पती आहे. तिची शेती केली जात नाही. मात्र, पारनेर तालुक्यात निघोज येथील शेतकºयाने जंगलातून कर्टुल्याचे कंद आणून एक एकर पीक उभे केले आहे. त्यांनी पिकविलेल्या कर्टुल्यांना मधुमेही रुग्णांकडून मोठी मागणी आहे. ही वेलवर्गीय वनस्पती आहे. कारल्यासारखा तिचा वेल जातो. अ‍ॅपल बोराच्या आकाराची हिरवी फळे या वनस्पतीला येतात. ती काटेरी दिसतात. फळांमध्ये बियाही असतात. या फळांचा वास हा जंगली आहे. हे फळ उपयुक्त असले तरी त्याची शेती मात्र केली जात नाही. निघोज येथील राहुल अमृता रसाळ यांनी जंगलात जाऊन कुर्टुल्याचे कंद आणले. त्यापासून रोपे तयार केली.चैत्र पालवीच्या काळात हवेत आर्द्रता वाढते. हवेतील आर्द्रता वाढली की या वनस्पतीचे वेल जातात व फळे येतात. आर्द्रता संपेल तसे उत्पन्न कमी होत जाते. एकदा वेल तयार झाला की तो सात वर्षे टिकतो.कारल्याच्या शेतीप्रमाणे ही शेती करता येते. रसाळ यांनी पिकविलेल्या कर्टुल्यांना आत्तापर्यंत किलोमागे तीनशे रुपयांपर्यंतचा भाव मिळाला आहे. कर्टुल्यामध्ये नर व मादी असा फरक असतो. नर असलेल्या वेलाला फळे येत नाहीत. मात्र बागेत नर व मादी अशी दोन्ही रोपे लावावी लागतात. अशी रोपे मिळवून रसाळ यांनी ही शेती विकसित केली आहे.रसाळांची शेती म्हणजे प्रयोगशाळाराहुल रसाळ हे तरुण असून कृषी पदवीधर आहेत. पदवी घेतल्यानंतर ते पूर्णवेळ शेती करत आहेत. त्यांचे वडील अमृता रसाळ हेही शेतीत सतत प्रयोग करत आले आहेत. राहुल यांनी शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी स्वखर्चाने आठ देशांचा दौरा केला आहे. मशागतीसाठी ते स्वत: शेतात राबतात.कर्टुल्याचे फळ हे मधुमेहावर उपयुक्त आहे, असे आपण वाचले होते. त्यामुळे या पिकाची शेती कशी करता येईल यावर अभ्यास केला. त्यातून एक एकर क्षेत्रात हे पीक घेतले आहे. - राहुल रसाळ, शेतकरी