शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परजिल्ह्यात जाऊ इच्छिणा-यांची फिटनेस सर्टिफिकेटसाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 10:44 IST

शासकीय रुग्णालयातून तपासणी करणे आणि आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहोत, याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्यासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि.५ मे) सकाळपासून एकच गर्दी झाली आहे.

अहमदनगर :  परजिल्ह्यात आणि परराज्यात जाण्यासाठी शासनाने परवानगी दिल्यानंतर जाण्याआधी आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शासकीय रुग्णालयातून तपासणी करणे आणि आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहोत, याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्यासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि.५ मे) सकाळपासून एकच गर्दी झाली आहे.राज्यशासनाने परजिल्ह्यात आणि परराज्यात जाण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यासाठी प्रशासनाकडून खास परवानगी देण्यात आली आहे.  आॅनलाईन अर्ज करून परजिल्ह्यात किंवा परराज्यात जाण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार परप्रांतीय कामगार, मजूर यासोबतच नागरिकांनाही परजिल्ह्यात किंवा परराज्यात जाता येते. तसेच काही कंपन्या, कारखाने, उद्योग सुरू करण्याची परवानगी दिल्याने अनेकांना नोकरीच्या ठिकाणी हजर होण्याचा आदेश मिळालेला आहे. अशांना परजिल्ह्यात जायचे असेल तर जिल्हा रुग्णालयाचे फिटनेस सर्टिर्फिकेट असणे आवश्यक आहे. त्यासाठ जिल्हा रुग्णलयात परजिल्ह्यात जाऊ इच्छिणाºयाची आरोग्य तपासणी केली जाते. त्यानंतर त्याला तसे प्रमाणपत्र दिले जाते. असे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात एकच झुंबड उडाली आहे. सोमवारीही आठवड्याचा पहिला दिवस होता. त्यादिवशीही मोठी गर्दी होती. आज मंगळवारीही सकाळपासून मोठी गर्दी असल्याचे दिसते.परजिल्ह्यात नोकरीच्या ठिकाणी जाणे, आपले अडकलेले कुटुंबिय परत आणणे या जिल्ह्यात असलेले परराज्यात जाण्यासाठी आसुसले आहेत. जिल्हा रुग्णालयात मंगळवारी सकाळी रांग होती. मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे जिल्हा रुग्णालयात पहायला मिळाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य