शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

हिरण हत्याकांडामुळे पोलिसांवर टीकेची झोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:36 IST

श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्यांकाडाच्या तपासात काही अंशी प्रगती झाली असली तरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मात्र ...

श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्यांकाडाच्या तपासात काही अंशी प्रगती झाली असली तरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मात्र टीकेची झोड उठली आहे. विशेषत: बेलापूर ग्रामस्थांनी पोलिसांच्या तपासाच्या पद्धतीवर जाहीरपणे गंभीर आरोप केले. अधिवेशनातही विरोधी पक्षांनी त्यावरून रान उठविले. त्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेला या घटनेमुळे धक्का बसला आहे.

या गुन्ह्यात आतापर्यंत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. स्वत: जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील येथे हिरण यांचा मृतदेह आढळल्यापासून ठाण मांडून आहेत. पोलीस महानिरीक्षकांनीही येथे भेट देऊन पाहणी केली. मात्र, तरीही पोलिसांवरील व्यापारी समाजाचा रोष कमी झालेला नाही.

सोमवारी हिरण यांचे बेलापुरातून सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान अपहरण झाले होते. मात्र, मंगळवारी दुपारी उशिरा याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यासाठी ग्रामस्थांना निवेदन द्यावे लागले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना ग्रामस्थांनी माहिती दिली. त्यानंतरच तपासाला काही प्रमाणात गती मिळाली.

सोमवारी रात्री हिरण बेपत्ता होताच पोलिसांनी तालुक्याच्या सीमेवर नाकाबंदी करणे अपेक्षित होते. मात्र, तसे घडले नाही. अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये तत्काळ शहरातील काही अट्टल गुन्हेगारांवर तपासात लक्ष केंद्रित करणे गरजेचे होते. त्यातून पोलिसांना धागेदोरे मिळू शकले असते. मात्र त्या पातळीवर कारवाया झाल्या नाहीत.

विधानसभेच्या अधिवेशनामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी गृहखात्याचे हे अपयश असल्याची टीका केली. मात्र, जिल्हा पोलीस प्रमुखांना आरोप मान्य नाहीत. तपासात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आले तर कार्यवाही केली जाईल, असे पाटील यांचे म्हणणे आहे.

----------