श्रीगोंदा : तालुक्यातील येळपणे जिल्हा परिषद गटातील एका गावात तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाचा ठराव घेण्यावरून वाद झाला. त्यानंतर सरपंच यांनी आठ जणांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यावर दुसऱ्या गटाने सरपंचासह बारा जणांच्या विरोधात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी घडली होती.
एका महिलेने दिल्या फिर्यादीवरून बापू हरिश्चंद्र कातोरे, मंगेश पोपट महाडीक, निलेश भास्कर कातोरे, जालिंदर मुकुंदराव महाडीक, विश्वास भिमक कातोरे, प्रशांत तुकाराम महाडीक, गणेश मच्छिंद्र महाडीक, मच्छिंद्र अर्जुन कातोरे, गणेश सीताराम कातोरे, प्रसाद तुकाराम महाडीक, किरण आनंदा कातोरे आदीं विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला.
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ठराव घेण्यासाठी आयोजित केलेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी दिलीप कातोरे यांनी अनिल महाडीक यांच्या नावाची सूचना मांडली. त्यावर सरपंच यांनी हस्तक्षेप केला. अध्यक्षपदासाठी गणेश महाडीक यांच्या नावाची सूचना मांडली आणि एकच गोंधळ उडाला. त्यातूनच वाद उद्भवला असे फिर्यादीत म्हटले आहे.