शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

आठ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा; सुपा एमआयडीसी परिसरातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 19:06 IST

कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत आठ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांविरुध्द सुपा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.

सुपा : कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत आठ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांविरुध्द सुपा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तरुण अजित सुभाष थोरात या तरुणाने फिर्याद दिली आहे.  १४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान अजित थोरात यास आरोपी विश्वजित रमेश कासार (रा.वाळकी, ता. जि.अहमदनगर), सुनील फक्कड अडसरे (रा. शेडाळा, ता.आष्टी, जि.बीड), मनोज चोबे (रा.बाबुर्डी, खडकी,ता.जि.अहमदनगर), अमोल खरमाळे (रा.सुपा,ता.पारनेर) व त्यांचे इतर अनोळखी चार साथीदारांंनी  जबरदस्तीने बिगर नंबरच्या एका कारमध्ये बसवून जुना सुपा एम.आय.डी.सी. परिसरात  नेले. या ठिकाणी दुसºया एका काळ्या रंगाच्या कारमध्ये मनोज चोबे व त्याच्यासोबत दोन अज्ञात आरोपींनी थोरात यास उतरुन घेतले. तेथे विश्वजित कासार व त्यांच्या साथीदारांनी फिर्यादीस वारंवार आठ लाख रुपयांच्या खंडणी मागणी केली. यावेळी त्यांनी थोरात यास कोयत्याचा धाक दाखवून धमकी दिली, असे थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सुपा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले व त्यांचे सहकारी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरCrime Newsगुन्हेगारीMIDCएमआयडीसी