शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

चार मंडळांविरुद्ध गुन्हे

By admin | Updated: September 21, 2023 15:24 IST

अहमदनगर: प्रमाणापेक्षा मोठ्या आवाजात डीजे वाजविल्याबद्दल सावेडी येथील दोन, तर माळीवाडा येथील दोन अशा चार मंडळांवर डीजेचालकांसह पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

अहमदनगर: प्रमाणापेक्षा मोठ्या आवाजात डीजे वाजविल्याबद्दल सावेडी येथील दोन, तर माळीवाडा येथील दोन अशा चार मंडळांवर डीजेचालकांसह पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. कारवाई झालेल्या मंडळांमध्ये शिवसेनेच्या दोन्ही मंडळांचा समावेश आहे.शहरात निघालेल्या मिरवणुकीमध्ये १४ मंडळे सहभागी झाली होती. १२ मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर केला. शिवसेनेच्या दोन्ही मंडळांनी डीजे लावून ध्वनीपातळीचे उल्लंघन केले. या प्रकरणी दोन गुन्हे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. माळीवाडा येथील समझोता तरुण मंडळाने डीजे लावला होता. या मंडळाने कापड बाजार, नवीपेठ, नेताजी सुभाष चौक या भागात मर्यादेपेक्षा डीजेचा आवाज वाढविला. या मंडळाचे अध्यक्ष शिवाजी अशोकराव कदम व त्यांचे डीजेचालक व मालक (नाव माहिती नाही) अशा तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. शिवसेना शहर मित्र मंडळानेही कापड बाजार, अर्बन बँक रोड, नवीपेठ, नेताजी सुभाष चौकात मोठ्या आवाजात डीजे वाजविला. या मंडळाचे अध्यक्ष संभाजी अशोकराव कदम यांच्यासह डीजेचे मालक व चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सावेडीमधील मिरवणुकीमध्येही डीजेचा चांगलाच दणदणाट झाला. दोस्ती तरुण मंडळ, यशोदानगरचे अध्यक्ष मंगेश अरुण थोरात आणि डीजेचालक विकास विलास भापकर, तर गोरक्षनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष जालिंदर सुरेश शिंजे (रा. वैदुवाडी), व डीजेचालक सचिन भानुदास अकोलकर अशा चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ध्वनिपातळीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे, पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे, सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करून नागरिकांना त्रास व अडथळा होईल, असे वर्तन, गैरसोय, धोका उत्पन्न होईल अशा स्थितीत मिरवणूक काढणे, तसेच पर्यावरण कायद्याचा भंग करणे या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विकास खंडागळे, जगदीश पोटे, तोफखाना पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल राजेंद्र गर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सावेडी येथील चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली आहे. (प्रतिनिधी)