शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी चोरणा-या डोंगरवाडीच्या माजी सरपंचाविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 18:08 IST

वांबोरी चारी पाईपलाईन योजनेची फोडतोड करून पाण्याची चोरी करणा-या डोंगरवाडीचे माजी सरपंच दिलीप गिते यांच्याविरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशनला पहिला गुन्हा दाखल केला. या पाण्यातून डोंगरवाडीचा पाझर तलाव भरुन घेतला आहे.

करंजी : पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या वांबोरी चारी पाईपलाईन योजनेची फोडतोड करून पाण्याची चोरी करणा-या डोंगरवाडीचे माजी सरपंच दिलीप गिते यांच्याविरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशनला पहिला गुन्हा दाखल केला. या पाण्यातून डोंगरवाडीचा पाझर तलाव भरुन घेतला आहे. वांबोरी चारी पाईप योजनेचे  पाणी घाटसिरस, मढी, तिसगाव, शिरापूर या गावच्या तलावात पाणी गेले पाहिजे यासाठी या भागातील शेतक-यांनी अनेक आंदोलन केली. ‘लोकमत’ने याचा वेळोवेळी पाठपुरावा केला. या भागातील लोकांच्या तीव्र भावना व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून प्रशासनाने कंबर कसली. पाटबंधारे खात्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्या अथक परिश्रमानंतर वांबोरी चारीचे पाणी टेलच्या मढी गावाच्या तलावात पोहोचले. परंतु दोन-तीन दिवसात या भागातील काही नागरिक वॉल खोलणे, पाईपलाईन फोडून पाण्याची चोरी करीत होते. या पाणी चोरीमुळे टेलला पाणी जाण्यास अडचणी येत होत्या.   मुळा पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांनी अशा पाणी चोरांविरुद्ध यंत्रणा तयार करून मोहिम राबविली. या योजनेची पहाणी करीत असताना मुळाच्या उपमुख्य कार्यकारी अभियंता सायली पाटील व शाखा अभियंता पद्मसिंह तनपुरे यांना डोंगरवाडी तलाव या योजनेत समाविष्ट नसताना येथील एअरवॉलचे नुकसान करून तलावात पाणी घेत असल्याचे निदर्शनास आले. हे कृत्य करणा-या दिलीप कारभारी गिते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापूर्वी सातवड येथे पाईपलाईनची फोडतोड करणा-या अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. वांबोरी चारी पाईपची फोडतोड करणा-याविरूध्द कठोर कारवाई करावी, लाभधारक  शेतक-यांनी केली आहे.  वांबोरी चारी पाईपलाईनचे पाणी टप्प्या टप्प्याने सर्वांना मिळणार आहे. परंतू योजनेचे नुकसान करून पाईपलाईन फोडून पाणी चोरी करणाविरूध्द कडक कायदेशीर कारवाई करणार आहे, असे मुळा धरणाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सांगितले.  वांबोरी चारी पाईपलाईन फूट-तुटीमुळे दुरुस्त करणा-या यंत्रणेवर मोठा ताण पडतो. याचा परिणाम योजनेच्या पाण्यावर होत आहे. वेळ, खर्च वाढून योजना विस्कळीत होते, असे पाटबंधारेचे निरीक्षक नितीन काचुळे यांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीAhmednagarअहमदनगर