मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना ग्रामस्थांनी दिले आहे.
मावलाई ओढा, वनबंधाऱ्यानजीक बाराही महिने पाझर होत असून हे पाणी हे गर्दणी परिसरात वाहून जाते. या ठिकाणी विहीर करुन पाईपलाईनव्दारे गावाला पाणी पुरवठा केल्यास कानडवाडी, कुंडाची वाडी, वाळविहीर वाडी, गावंडे वस्ती, काळूची वाडी या परिसरातील पाणीप्रश्न कायमचा सुटू शकतो. मुथाळणे गावात बेलदार बांधणी ओहळ येथे देखील वनविभागाच्या जमिनीत पाण्याचा मोठा स्त्रोत आहे. येथेही विहीर झाल्यास मुथाळणे गावठाण, ठाकरवाडी, बांगारे वस्ती टँकरमुक्त होऊ शकतो. भैरोबावाडी येथे वनविभागाच्या हद्दीत विहीर केल्यास आदिवासी ठाकर वस्तीचा पाणीप्रश्न सुटू शकतो. नायकरवाडी खांड आणि चिमणदरा येथेही वनविभागाच्या हद्दीत विहिरी झाल्यास अनेकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल. या आशयाचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता, वनविभागाचे उपविभागीय अधिकारी अकोले यांना देण्यात आले आहे.
निवेदनावर दत्तू होलगीर, चक्रधर सदगीर, संतू करवर, नामदेव गावंडे, नामदेव फोडसे, भीमा सदगीर, किसन होलगीर, बाळू सदगीर, नवनाथ होलगीर यांच्या सह्या आहेत.