शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांच्या बॅगा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 16:05 IST

महापालिकेच्या निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या ६८ नगरसेवकांची नावे गुरुवारी (दि. १३) राजपत्रात (गॅझेट) प्रसिद्ध होत आहेत

अहमदनगर : महापालिकेच्या निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या ६८ नगरसेवकांची नावे गुरुवारी (दि. १३) राजपत्रात (गॅझेट) प्रसिद्ध होत आहेत. शिवसेना-भाजपचे नगरसेवक स्वतंत्रपणे गुरुवारीच नाशिकला हजर होणार आहेत. तिथे गटनोंदणी होण्याची शक्यता आहे. गटनोंदणी होताच सहलीवर रवाना होण्याच्या उद्देशाने नगरसेवकांनी रात्रीच त्यांच्या बॅगा तयार ठेवल्या होत्या.महापालिकेच्या निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांच्या नावांची पक्षनिहाय यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शासकीय मुद्रणालयाकडे पाठविली. महापालिकेचे नगरसचिव तथा सहायक आयुक्त एस. बी. तडवी यांनी ही यादी बुधवारी सादर केली. या राजपत्राची बुधवारीच छपाई झाली. राजपत्र १३ डिसेंबरच्या तारखेने प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे या राजपत्राची प्रत गुरुवारी महापालिकेला मिळेल. मात्र त्यापूर्वीच राजकीय पक्षांनी गटनोंदणी करण्याच्या हालचाली वेगवान केल्या आहेत.गुरुवारी राजपत्र मिळताच महापालिका प्रशासनाकडून याची माहिती नाशिक येथील विभागीय आयुक्तांना पाठविली जाईल. यामध्ये महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्याबाबत अवगत करण्यात येईल. त्यामुळे पुढील आठवड्यातच महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपच्या काही नगरसेवकांनी नाशिक येथील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात जावून चौकशी केली आहे. त्यामुळे ते नगरसेवकही नाशिकला गुरुवारीच गटनोंदणीसाठी रवाना होण्याची शक्यता आहे.४खासदार तथा शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी हे सध्या दिल्लीत आहेत. दिल्ली येथून ते गुरुवारी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या आदेशाप्रमाणे ते युतीबाबत निर्णय घेणार आहेत. दरम्यान जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्यावर नाशिक येथील गटनोंदणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रा. बेरड यांच्यासह काही नगरसेवकांनी नाशिक येथेच जाऊन गटनोंदणीची प्रक्रिया माहिती करून घेतली.राठोड यांनी दिला बॅगा तयार ठेवण्याचा आदेशशिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना त्यांच्या बॅगा तयार करण्याचा आदेश उपनेते अनिल राठोड यांनी बुधवारी दिला. कोणत्याही क्षणी फोन येताच बॅगांसह शिवालयात या, असा आदेशच त्यांनी सोडला. गुरुवारी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नाशिकला जाणार आहेत. तेथूनच ते सहलीवर जाणार आहेत. त्यामुळे नगरसेवकांनी बुधवारी रात्रीच बॅगा तयार ठेवण्याचे राठोड यांनी नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका